
महाराष्ट्र

बोकड कापायच्या सूऱ्याने 70 वर्षाच्या वृद्धाला कापले, खुन्याला ठोकली जन्मठेप
सरकार पक्षातर्फे ॲड.अजय सानप यांनी केलेला युक्तिवाद व साक्ष ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर यांनी दिली शिक्षा धुळे – तालुक्यातील वार गावातील खुनाच्या घटनेत दि.१९ मार्च २०२१ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० च्या दरम्यान आरोपी ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याने आत्माराम हिरामण पारधी (वय. ७० वर्षे) रा.वार ता. जि.धुळे यांच्या डोक्यावर, हातावर, बोटावर बोकड कापण्याचे…

शेतकऱ्यांनो..संधी घालवू नका,खरीप पिकाची पीक पाणी लावून घ्या !
तलाठी संजीव गोसावी यांनी केले आवाहन दोंडाईचा- शहरासह ग्रामीण भागातील खरीप पिकाची पीक पाहणी शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट पासून लावून घ्यावी असे आवाहन तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा दोंडाईचा शहर तलाठी संजीव गोसावी यांनी केले आहे.यावर्षी खरीप पिक पाहणी मोबाईल द्वारे नोंदवून घेण्यास सोशल मीडियावर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत आवाहन करण्यात येणार आहे. पिक पाहणी मोबाईलद्वारे न लावल्यास…

धुळे शहरातील तरुणांसाठी रोजगाराची/नोकरीची सुवर्णसंधी
भव्य रोजगार / नोकरी मेळाव्याचे आयोजन “रोजगार व युवा विकास” हेच आदरणीय शरदचंद्र पवार यांचे धोरण राहिले असून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळे शहर जिल्हाध्यक्ष .रणजीत राजे भोसले यांच्या वतीने धुळे शहरातील तरुणांसाठी “भव्य रोजगार / नोकरी मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, बेंगलोर, संभाजीनगर…

दोंडाईचा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी निरीक्षक किशोर परदेशी यांच्यासमोर मोठी आव्हाने
अतिरिक्त एपीआय निलेश मोरे कडून निरीक्षक किशोर परदेशी यांनी स्विकारला पदभार दोंडाईचा- (श. प्र.) जनहितार्थ, प्रशासकीय कारणावरून तसेच कायदा सुव्यवस्थाची स्थिती प्रभावीपणे अंमलबजावणीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यात दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बदली नरडाणा पोलीस ठाणे येथे झाली असून त्यांच्या जागी धुळे नियंत्रण कक्ष येथील…

सकारात्मक जीवन शैलीने ताण तणाव कमी होऊ शकतो, मान्यवर डॉक्टरांनी केले प्रशिक्षणार्थी पोलिसांना मार्गदर्शन
आरंभ फाउंडेशन ने राबविला उपक्रम धुळे -आपल्या दैनंदिन जीवनात रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने ताणतणाव वाढतच असतो. त्याचे नियोजन कशाप्रकारे केले आणि सकारात्मक विचार शैली ठेवून कामाचे नियोजन केले, तर ताण तणाव कमी करता येऊ शकतो, असे मत तज्ञांनी मांडले. प्रशिक्षणार्थी पॉकीस बांधवांसमोर ते बोलत होते.धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आरंभ फाउंडेशन च्या वतीने दिनांक…

लाडक्यांसाठी योजना आणणाऱ्या सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडला, ही खरी शोकांतिका-बालरोग तज्ञ डॉ अभिनय दरवडे
धुळे पालक अकाली गेल्यामुळे अनाथ झालेले, गरीब, वंचित, परिस्थिती मुळे काम करून शिक्षण घेणाऱ्या धुळे शहरातील समता शाळेतल्या गरजू 60 विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ अभिनय दरवडे आणि त्यांच्या पत्नी डॉ मिनल दरवडे यांनी गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ चे वाटप केले.. गणवेश नाही म्हणून शिक्षण थांबायला नको हा उद्देश डोळ्यासमोर…

धुळेकरांना अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने मिळणार “डिस्काउंट कार्ड”… स्वतंत्र अँपमुळे आता खरेदीची चिंता होणार कमी
धुळे I प्रत्येकाला दररोज कुठे न कुठे, कोणती न कोणती वस्तू खरेदी करावीच लागते. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबतच आरोग्याच्या समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, मेडिसिनवर अमाप खर्च होणे, हे सारे टाळता येणारे नाही. परंतु महागाईमुळे जनत्याला होणारा त्रास विचारात घेऊन धुळे महानगरीत सर्वसामान्य नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी ही…

शेतकरी विरोधी ठरवत काँग्रेसने केला अर्थसंकल्पाचा निषेध, धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
धुळे – नुकताच जाहिर झालेल्या केंद्र सरकारने अर्थ संकल्पात देशातील शेतकऱ्यांनासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली नाही. एम एस पी वाढीचा उल्लेख नाही. कर्जमाफीबद्दल शब्द नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. यामुळे आज २६ जुलै रोजी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शामकांत…

‘शिक्षण सप्ताह’ निमित्ताने “जयहिंद” मध्ये कृतीमधून क्रीडा दिवस साजरा
धुळे : (२४ जुलै) येथील जयहिंद हायस्कूल, धुळे येथे शिक्षण सप्ताहातील एक दिवस हा क्रीडा दिवस म्हणून प्रत्यक्ष जयहिंद जलतरण तलाव स्थळी कृतीमधून साजरा करण्यात आला.या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस्. व्ही. बैसाणे, उपमुख्याध्यापक श्री. एस्. डी. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संचालक श्री. डी. व्ही. निकम यांनी श्री. वाय. एस्. चव्हाण व श्री. प्रितम…

आयपीएस अधिकारी रहमान यांचे उमेदवारीचे स्वप्न पुन्हा भंगले..!
स्वेच्छा निवृत्तीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली धुळे I लोकसभा निवडणुकीत धुळ्यातून वंचित बहुजन आघडीतर्फे उमेदवारी करणारे आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांचे पुन्हा उमेदवारी करण्याचे स्वप्न सध्या तरी भंगले आहे. कारण, उच्च न्यायालयाने रहमान यांनी केलेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीची याचिका फेटाळून लावली आहे. स्वेच्छानिवृत्तीची मागणी फेटाळण्याच्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार…