अमित शाह हे तडीपार गृहमंत्री – जयंत पाटील यांचा घणाघात

शिंदखेड्यात राष्ट्रवादी निष्ठावंतांचा मेळावा दोंडाईचा । प्रतिनिधीदेशात 400 पार करण्याचा नारा देणाऱ्यांना 240 वर थांबवले यात खरा लोकशाहीचा विजय झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शिंदखेडा येथे मन मिरा मंगल कार्यालयात निष्ठवांत कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.. महाविकास आघाडीच्या काळात सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला…

Read More

धुळे ग्रामीण मतदार संघात शिवसेना करणार झंझावात,२००९ची पुनरावृत्ती होऊन भगवा फडकेल,असा विश्वास

धुळे, प्रतिनिधी I धुळे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा झंझावात पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. हिलाल माळींच्या नेतृत्वात शिवसैनिक सज्ज होत असून २००९ साली झाला तसा चमत्कार यावेळी घडेल आणि विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणवर पुन्हा एकदा भगवा फडकेल. असा विश्‍वास माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी व्यक्त केला आहे. धुळे ग्रामीणमध्ये हिलाल माळींचे कार्य जोमाने सुरु असल्याने जनता त्यांना नक्की…

Read More

दोंडाईचा येथे बाह्मणे रेल्वे गेट नजीक सर्व्हिस रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली चाळण,

ठेकेदारांच्या मनमानीवर वचक कुणाचा ? दोंडाईचा । प्रतिनिधीधुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा येथे बाम्हणे रेल्वे गेट नजीक उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने सर्व्हिस रोड अतिशय खराब झाला आहे.. या रस्त्यावर वाहन चालवणे तर अशक्यच आहे… पायी चालणे देखील अवघड बनले आहे. ठेकेदार लक्ष देण्यास तयार नाही, अशी वाहनधारकांची तक्रार आहे. मागच्या वर्षी याच रस्त्यासाठी शिवसेना…

Read More

निवृत्त शिक्षकांची पुंजी घेऊन चोरट्यांचा पोबारा

धुळे : प्रतिनिधी I शहरातील राजगुरु नगरात एका सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी हात साफ केला. यात बारा ग्राम सोने- चांदीसह, पंधरा हजार रोख रुपये लांबवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत राजगुरुनगर प्लॉट नंबर 39/41 येथे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर रामचंद्र धात्रक हे राहतात. रात्री चोरटयांनी घराचा काडी कोयंडा…

Read More

आधीच कोठडीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन पुन्हा ठोकल्या बेड्या

धुळे- ( प्रतिनिधी ) धुळे शहरा लगत सुरत बाय पास रस्त्यावर रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या व्यक्तीस लुटणाऱ्या आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या कडून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. दादाभाऊ बारकू पारधी रा. कुंडाणे हे २५ जून रोजी रात्री ११ वाजता सुरत बाय पास रस्त्याने सिव्हिल हॉस्पिटलला जात असताना मागून मोटारसायकल ने आलेल्या…

Read More

देशाची सुरक्षितता धोक्यात, धुळ्यात आतंकवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला निषेध

धुळे – देशातील वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या निषेधार्थ आज धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले.गेल्या दीड महिन्यांपासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी आपला तिसरा कार्यकाळातील पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लागलीच दहशतवादी कारवायांनी डोके वर काढले. गेल्या दीड महिन्यात अनेक आतंकवादी हल्ल्यात एकट्या जम्मू विभागात एप्रिल ते…

Read More

चिमठाणे गावात मूलभूत समस्यांचा महापूर;सरपंचांचे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

शिंदखेडा – तालुक्यातील चिमठाणे गावात गेल्या 3 वर्षांपासून दलित आदिवासी वस्तीमध्ये ना गटारीचे कामे करण्यात आली, ना रस्त्यांची, त्यामुळे चिमठाणे गावातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले आहेत. तीन वर्षापासून चिमठाणे ग्रामस्थ सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे यांच्याकडे गटारी व रस्त्यांच्या मूलभूत प्रश्न करिता मागणी करीत आहे, मात्र सरपंच आणि त्यांचे पती व पुत्र या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे…

Read More

प्रति पंढरपूर गोताणे येथे अश्विनी पाटील यांच्या हस्ते महापूजा, चि. रायबा पाटील यांनी केली महाआरती

धुळे- शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी पांडुरंगाला साकडे घालत अश्विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते व प्रतिपंढरपूर गोताणे येथे पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाचा सोहळा उत्साहात झाला.प्रतिपंढरपूर गोताणे ता. धुळे येथे वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती ह. भ प. दामोदरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने भव्य असे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर उभारण्यात…

Read More

दोंडाईचा मध्ये भोगावती नदीला मोठा पूर, घरामध्ये शिरले पाणी

दोंडाईचा- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरामध्ये पाणी गेले.चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरी च्या गल्लीत काही घरामध्ये पाणी शिरले. तर वरवाडे भागातील हात गाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्याचे सांगितले जाते. पाठोपाठ अमरावती नदीलाही पूर आला आहे.नदीच्या पुरामुळे काही नागरिकांचा संपर्क…

Read More

दोंडाईच्यात पावसाळ्यात डांबरीकरण,अधिकाऱ्यांना माहितीच नाही

दोंडाईचा – शहरातील मोनाली हॉटेल पासून ते केशरानंद पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुन्हा सुरू आहे. विशेष म्हणजे पालिकेपासून अवघ्या काही अंतरावर सुरु असलेल्या या कामाबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहितीच नाही. मग संबंधित ठेकेदार कोणाच्या पाठबळावर एवढी हिम्मत करतोय कि अधिकारी त्याला पाठीशी घालताय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण करू नये असा शासन…

Read More
Back To Top