
महाराष्ट्र

शहाद्याचे बसस्थानक नव्हे, हे तर समस्यांचे ‘आगार’
शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकाची खड्डांमुळे अतिशय दुरावस्था झाली असून बसस्थानकात जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या पाण्याच्या डबक्यांना चिखलाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अशातच प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी याच पाण्याच्या डबक्यांमधून मार्ग काढत लागावा लागतत आहे. दुसरीकडे प्रवाश्यांना बसस्थानकात उभे राहण्यासाठी देखील जागा नसून साचलेल्या पाण्याच्या डबक्यामधुन दुर्गंधी आणि रोगराई पसरत असल्याचे चित्र आहे….

धुळे खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या जवाहर गटाच्या हाती पुन्हा सत्ता देणार का ? थेट सवाल
महायुती प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलची पत्रकार परिषद धुळे – खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या जवाहर गटाच्या हाती पुन्हा सत्ता देणार का? असा थेट सवालकरीत शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलच्या हाती धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीची सत्ता द्या, असे आवाहन पत्रकार परिषदेच्या…

धुळे जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी24 कोटी 75 लाखाच्या निधीस मंजुरी
पालकमंत्री गिरीष महाजन यांचा पुढाकार धुळे : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी मा. बाळासाहेब धुळे जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी24 कोटी 75 लाखाच्या निधीस मंजुरीठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींना स्वत:चे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी राज्याचे ग्रामविकास, पंचायती…

धुळे एज्युकेशनच्या विद्यामंदिरांना दानशूर मिश्रीबाई आणि ओंकारमल अग्रवाल यांचे नाव
धुळे – येथील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या दोन प्राथमिक विद्यामंदिरांच्या नामकरणाचा सोहळा ४ जुलै रोजी होतो आहे. संभाजीनगर येथील सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक डॉ रमेश पांडव यांच्या हस्ते आणि महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष महंत आचार्य साळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. सुप्रसिद्ध उद्योग संस्था ओमश्री ऍग्रो टेक प्रा. लि. हे या नामकरणातील प्रमुख देणगीदार आहे…

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खाजगी सायबर कॅफे चालकांकडून नागरिकांची लूट
शहादा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केलीये. याची लगेचचंअंमलबजावणी सुरु होऊन कागदपत्रांसह नावनोंदणीही सुरु झालीये त्यामुळे तहसील कार्यालयावर सध्या तोबा गर्दी होत असल्याचे आढळून येतेय. तसेच योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विविध खाजगी सायबर कॅफेंवर देखील नागरिकांची झुंबड उडतेय.. मात्र याचा फायदा घेऊन काही सायबर कॅफे चालक…

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
खान्देश पुत्र ठरलेत अदखलपात्र धुळे – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती 26 हजार 476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी 31 हजार 576 इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 32 हजार 309 मते मिळवून नाशिक शिक्षक मतदार संघातून…

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवा, युवा सेनेची शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी
धुळे : इयत्ता १०वी – १२वीचे निकाल लागून दोन तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र धुळ्यातील अनेक महाविद्यालये प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करताना दिसत आहेत. या बाबत विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकारी आणि युवा सैनिकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज…

पावसाने शाळेचे पत्रे उडाले, विद्यार्थ्यांची गैरसोय.. शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्ष
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यातल्या नवा तोरणमाळच्या बुरमेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे उडून जावून इमारतीची पडझड झाल्याने विद्यार्थ्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शाळेचे पत्रे उडून जवळपास पंधरा दिवस उलटत आले असले तरी याबाबत इमारत पाहणीला शिक्षण विभागाचे कोणीही इकड फिरकलेच नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असल्याचे चित्र आहे. राज्यातले क्रमांक…

परसुळे गावातील अंगणवाडीत निकृष्ट पोषण आहाराचे वाटप – तक्रार
धुळे – शिंदखेडा तालुक्यातील परसुळे गावात अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचे पोषणआहार दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत आदिवासी टायगर सेनेने तक्रार केली असून या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे.आंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांना सकस व पोषक आहार मिळाला पाहिजे. यातून कुपोषणासारखी समस्या पळवून लावता येऊ शकते या उद्दात हेतूने शासनाने मोफत पोषण आहार…

धुळ्यात भाजपचा झेंडा मातीत पुरून रस्त्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन
धुळे – शहरातील देवपुरात एस एस व्ही पी एस कॉलेज समोरील रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. यामुळे वाहतुकीस मोठा खोल्मबा होत असून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महानगरपालिका, भूमिगत गटार व भाजपा विरोधात आज तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीने निवेदनात म्हटले आहे की , धुळे शहरांमध्ये…