
महाराष्ट्र

अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली जिंदाल दुर्घटनेची चौकशी
नाशिक : जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. मुंढेगाव येथे सुमारे जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत रविवारी लागलेल्या आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून स्थिर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन…

धुळ्यात हमालाचा खून, डोक्यात वार करून मारेकरी फरारखळबळ
धुळे : शहरातील श्रीराम पेट्रोल पंप जवळ एक मध्यम वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पंपा शेजारील सार्वजनिकशौचालयाच्या मागील बाजूस ४५ वर्षीय विजय या हमाली काम करणाऱ्या इसमाचामृतदेह पडलेलाअसल्याचे बघून खळबळ उडाली. विजय यांच्या डोक्यावर मोठी जखम आहे. त्यामुळे त्याच्या हल्ला करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्यक्ती मागील दोन महिन्यांपासून शहरात हमाली…

पुण्यात तरुणाने स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न करून पत्नी सोबतच सासू सासऱ्यांची हि केली फसवणूक
पुणे : एका ने स्वत: ला पेटवून घेतल्याचा प्रकार घडला. मात्र पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीने मला पेटवून दिल्याचा आरोप केला. लखन काळे असे तरुणाचं नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी लखन याच्या पत्नीसह सासू, सासरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु तपासात जखमीने स्वतःलाच पेटवून घेऊन सासू आणि सासऱ्यावर आरोप…

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; २ तरुणी जागीच ठार, लहान मुलासह तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु
ठाणे : मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूरजवळील कुमार गार्डन हॉलजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शहापुरातील कळंभे येथील दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो कार, रिक्षा आणि स्कुटी अशा तीन वाहनांना विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्कुटी आणि…

पोलिसांना घरे बांधून देणार पीएमआरडीए; ४ हेक्टर हून अधिक, जागेच्या बदल्यात ३९७ घरेहून अधिक जागेत
पिंपरी : औंधमधील चव्हाणनगर येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयाची ४ हेक्टर हून अधिक जागेत हिंजवडी मेट्रोसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मिळाली आहे. या बदल्यात ‘पीएमआरडीए’कडून ग्रामीण पोलिसांना ३९७ घरे बांधून दिली जाणार आहेत. या घरांसाठी एकूण शंभर कोटी रुपये खर्च येणार असून, लवरकच बांधणी कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ‘पीएमआरडीए’कडून सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर हिंजवडी ते…

नाशिक येथे प्रतिबंधित अन्न पदार्थांचा एक कोटी हून जास्त रुपयांचा साठा जप्त
नाशिक : अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने राज्यात प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थाचा एक कोटी हून जास्त रुपयांचा साठा जप्त केला.अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी छापेमारी केली. संबंधित विभागाच्या पथकाने वाडीवऱ्हे परिसरात संशयित वाहनाचा पाठलाग करत कंटेनरांची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. पैकी एका वाहनातून…

नाशिक येथील दुर्घटनेत मोटारीत बनावट नव्हे तर खेळण्यातील नोटा
नाशिक : शहरातील एका स्विफ्ट डिझायर मोटारीने प्रथम दुचाकी, नंतर टाटा नेक्सन वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातग्रस्त स्विफ्ट मोटारीत दोन पिशव्या भरून ५०० आणि दोन हजार रुपयांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा आढळल्या. त्यावर केवळ शालेय प्रकल्पांसाठी वापर आणि चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाचा उल्लेख असून त्या लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे….

महावितरणचा भुसावळात घरगुती ग्राहकाला आले 1 लाख 87 हजाराचे विजबिल
जळगाव : भुसावळच्या परिसरात ग्राहकांच्या घरातील वीज मीटरचे चुकीचे रिडिंग घेतले जात असून वीज बीलांच्या वाटपात दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली आहे. मुदत संपल्यानंतर ग्राहकांना वीज बिलांचे वाटप केले जात असल्याची तक्रार शहरातील ग्राहकांनी केली आहे. प्रत्येक महिन्यात चुकीचे रिडींग देऊन ग्राहकांना मनस्ताप देण्याचा प्रकार सुरूच असल्याने चुकीचे मीटर रिडींग देणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल…
साखर कारखाना कर्मचार्यांचे महामार्गावर आंदोलन
यावल : तालुक्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्यांनी थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दूर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी अंकलेश्वर- बर्हाणपूर महामार्ग रोखून रोष व्यक्त केला. आंदोलनस्थळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी भेट दिली. त्यावेळी कर्मचार्यांनी घोषणाबाजी करीत अध्यक्षांना घेराव घातला. यावल येथील सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी…

मुंबई हुन, घरी परतताना कंटेनरच्या धडकेत , दोन जण ठार तर एक जखमी
जळगाव : भरधाव कंटेनरने धडक दिल्याने गाडीतून प्रवास करणारे दोघे जण ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील हा भीषण अपघात झाला. मयतामध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल देविदास सौपुरे आणि डॉ. निलेश भीमराव मंगळे यांचा समावेश आहे. तर संदीप आनंदा पवार हे जखमी झाले आहेत. पारोळा शहरातील कुणाल सौपुरे, डॉ. निलेश…