
महाराष्ट्र

साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम १ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राबविण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार दिले. तसेच, ग्रामिण आरोग्य अधिकारी आणि…

बिबट्याच्या हल्ल्याच्या नावाखाली निर्दयी खून; बिबट्या नव्हे, नात्यातीलच खुनी !
दोन महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, पुढील पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे नसून, एका सुनियोजित कटाचा भाग होता. यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख आणि फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपीने खुनाची कबुली दिल्याने संपूर्ण तालुक्यात…

धुळ्यातील ‘त्या’ नर्सरीतील ४० हजार झाडे गेली कुठे?गौडबंगाल काय..? शिवसेना उबाठा चा सवाल
धुळे महानगरपालिकेच्या खाजगी जागेचा वापर करून नर्सरी चालवली जाते. थोडेफार नव्हे तर १५ ते २० फुटांपर्यंतची तब्बल ४० हजार झाडे वाढवली जातात.. तोपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला अचानक जाग येते.. या बाबत तक्रार होते. तत्कालीन जिल्हाधिकारी झाडे जप्त करण्याचा आदेश देतात.. मग ही झाडे तेथून नाहीशी होतात. उलट नर्सरी चालक कोर्टात धाव घेऊन दाद मागतात…

पुस्तक संस्कृतीचा जागर: धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे अधिवेशन उत्साहात संपन्न
शिंदखेडा तालुक्यातील वाडी (शेवाडी) येथे स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या निमित्ताने गावातून ग्रंथदिंडी मिरवणूक काढण्यात आली. वाजत-गाजत पार पडलेल्या या दिंडीत मोठ्या संख्येने गावकरी, विद्यार्थी आणि ग्रंथप्रेमींनी सहभाग घेतला. या प्रसंगी पुस्तकांच्या महत्त्वावर व्याख्यान, ग्रंथप्रदर्शन, कादंबरी प्रकाशन, पुरस्कार वितरण आणि ग्रंथालय व्यवस्थापनावर चर्चासत्र आदी…

नाशिकमध्ये आमदारच पोहोचले कॅफेवर : गंगापूररोडवरील कॅफेवर छापा, गैरकृत्य उघड
नाशिक : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेची चर्चा सुरू असतानाच, आज दि. १ मार्च रोजी नाशिकमध्येही एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवरील हॉटेल मोगली कॅफे वर छापा टाकून कारवाई केली आहे. या कॅफेमध्ये तरुण-तरुणींना 100 ते 200 रुपये भाड्यात तासांसाठी रूम दिल्या जात असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे….

शासनाचा महसूल थकविल्याप्रकरणी मोबाईल टॉवरवर महसूल विभागाची कारवाई
शासनाचा महसूल थकविल्याप्रकरणी महसूल विभागाने थकबाकी असणाऱ्या मोबाईल टॉवरला सील करण्याची मोहीम शिरपूर तहसील कार्यालयाने सुरु केली आहे. त्यानुसार शिरपूर तालुक्यातील मौजे अर्थे येथे इंडस व आइडिया कंपनी टॉवर सील करण्यात आले आहे. शिरपूर तालुक्यात इंडस, आइडिया, बीएसएनएल, जिओ अशा विविध कंपनीचे 123 टॉवर आहेत. महसूल विभागाने संबंधित कंपनीच्या थकबाकीदाराना महसूल वसुलीबाबत नोटिस बजावण्यात आली…

सहा वर्षांपासून फरार असलेला दरोड्याचा आरोपी अखेर दोंडाईचा पोलिसांच्या ताब्यात
दोंडाईचा: सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर दोंडाईचा पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीवर दोंडाईचा पोलीस ठाणे आणि नंदुरबार रेल्वे पोलीस ठाणे येथे चार गंभीर गुन्हे दाखल असून निलेश खंडू संसारे (रा. डालडा घरकुल, दोंडाईचा; ह.मु. आखातवाडे, शनिमंडळ, ता. जि. नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.दोंडाईचा येथील नंदुरबार चौफुलीजवळ…

स्वारगेट प्रकरणातील नराधम दत्तात्रेय गाडेचा आत्महत्येचा डाव फसला
पुणे: स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्तात्रय गाडे याने पोलिसांच्या धाकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजल्यानंतर गाडेने शेतातील झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण झाडाच्या फांदीला बांधलेली दोरी तुटली आणि तो खाली कोसळला.गुन्हे शाखेने मध्यरात्री दीडच्या सुमारास गुनाट गावातून गाडेला अटक केली. त्यानंतर त्याला…

धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना “बालस्नेही पुरस्कार २०२४” मिळणार!
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या प्रतिष्ठित “बालस्नेही पुरस्कार २०२४” साठी निवड झाली आहे. उत्कृष्ट पोलीस अधीक्षक म्हणून हा सन्मान त्यांना प्रदान केला जाणार असून, या नामांकनास अधिकृत मान्यता मिळाली आहे. आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शाह यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार सोहळा ३ मार्च…

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार-पणन मंत्री जयकुमार रावल
पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषद पुण्यात संपन्न पुणे – बाजार समित्या या कृषि पणन व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतांनाही, बाजार समित्यांनी शेतमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली. त्याची सरकारने, जागतिक बँकेने व प्रसार माध्यमांनीही दखल घेतली आहे,त्यामुळे राज्यातील बाजार समितीचे महत्त्व…