
महाराष्ट्र

धुळे देवपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीचे गुन्हे आणले उघडकीस
धुळे : देवपूर पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यातील आरोपींना तपास पथकाने यशस्वीपणे ताब्यात घेतले असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिराबाई नरहरी सोनार (वय ६४), मागदेव बाबा मंदीर, विटाभाटी, देवपूर येथील रहिवासी यांनी पोलिसांकडे तक्रार केली की, त्यांच्या…

धुळ्यात ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनला, विश्वविजेती मेरी कोम यांची भेट
विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांनी धुळे येथील ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनला भेट दिली. धुळे मॅरेथॉन २०२५ – सीझन ३ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मेरी कोम यांनी विशेष वेळ काढून छात्रसैनिकांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीमुळे कॅडेट्सना उच्चतम प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या मनोबलात मोठी वाढ झाली. या भेटीवेळी ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर…

कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे : प्रा शरद पाटील
धुळे: खान्देश विभागासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना धुळे येथे करावी, अशी मागणी आमदार प्रा. शरद पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. साक्री रोडवरील या पत्रकार परिषदेला माजी आमदार शरद पाटील, अॅड. प्रकाश पाटील, कैलास पाटील, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. हवामानातील बदल आणि जमिनीची घटती सुपीकता लक्षात घेता पिक पद्धतीत मोठे बदल होत आहेत. या…

जीबीएस’च्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करा
धुळे – प्रतिनिधीराज्यात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ची रुग्ण संख्या वाढत असुन गुलेन बारे सिंड्रोम आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करावी. असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.आज १ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन समिती सभागृहात गॅलेन बारे सिंड्रोम आजाराबाबत बैठक झाली. या बैठकीस आमदार अमरिशभाई…

सोनगीर पोलिसांनी उघडकीस आणली पतपेढीतील चोरी, 2 किलो 300 ग्रॅम चांदी हस्तगत
सोनगीर पोलिसांनी विठठल रुखमाई नागरी सहकारी पतपेढीतील चोरी उघडकीस आणली आहे. 13 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी पतपेढीच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून चांदी चोरून नेली.सुरुवातीला पोलिसांना या चोरीचा मागोवा घेणे कठीण जात होते. पण, तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्ही फुटेजमधून चोरांनी वापरलेली पांढऱ्या रंगाची ह्युंडाई एक्सेंट कार ओळखली. पोलिसांनी त्या…

महाराष्ट्र बनलं ‘पहिलं पाऊल’ टाकणारं राज्य!
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा गेमचेंजर प्रवास सुरू! महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाला दिशा दाखवली आहे! गुन्हे सिद्धतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या व्हॅनचे लोकार्पण सह्याद्री अतिथीगृह येथे उत्साहात पार पडले. ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ म्हणजे काय?आता गुन्हेगारांना वाचण्यासाठी कोणतीही पळवाट मिळणार…

धुळे तालुक्यातल्या सोनवाडी शिवारात 1 लाख रुपयांच्या घरफोडीचा थरार, आरोपी गजाआड!
धुळे जिल्ह्यातल्या सोनवाडी शिवारात एका 75 वर्षीय वृद्धाचा शेतातील घर फोडून 1 लाख रुपये लंपास झाल्याची घटना घडली होती. ही घटना 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घडली. बद्रीनाथ दामू निकम हे वृद्ध शेतात शेतीकाम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील घराचा दरवाजा फोडून पेटीत ठेवलेले 1,00,000/- रुपये चोरले.घटनेची तक्रार मिळताच धुळे…

वाघाड येथे पाणलोट रथ यात्रेचे नियोजन आणि विविध उपक्रमांसाठी विशेष ग्रामसभा संपन्न
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 अंतर्गत वाघाड (तालुका दिंडोरी) येथे मंगळवारी (दि. 21 जानेवारी 2025) सकाळी 9 वाजता सरपंच सौ. आशा गांगोडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत केंद्र व राज्य शासनाच्या पाणलोट विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने पाणलोट रथ यात्रेचे नियोजन सविस्तर मांडण्यात आले. ग्रामसभेत अनिल मधुकर शिंगाडे यांची ‘पाणलोट योद्धा’ म्हणून…

महिलांसाठी विकास योजना, कायदे आणि सक्षमीकरणावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
धुळे : श्री. शि.वि.प्र. संस्थेचे ना.स.पाटील साहित्य आणि मु.फि.मु.अ. वाणिज्य महाविद्यालयात “महिलांसाठी असणाऱ्या विविध विकास योजना” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा विद्यार्थी विकास विभागाच्या युवती सभेच्या अंतर्गत घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. वाघ सर होते, तर प्रमुख वक्त्या म्हणून अँड. गायत्री भामरे मॅडम आणि श्रीमती भावना पाटील मॅडम…

जिल्ह्यातील युवक, युवतींना इस्त्राईल मध्ये रोजगाराची सुवर्णसंधी
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी जिल्या वतील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या अधिकृत संकेतस्थळावर आपली माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे…