
महाराष्ट्र

धुळ्यातील व्यापाऱ्याकडून लुटले १३ लाख रुपये
अलीकडे सायबर क्राईम चा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, आणि धुळ्यात त्याचे एक भयानक उदाहरण समोर आलं आहे. एका इलेक्ट्रीकल फर्मच्या मालकाला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे (MSEDCL) MD बनवून चक्क १३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय.झालं असं कि धुळ्यातील जय श्री कृष्ण इंटरप्रायझेस या इलेक्ट्रीकल फर्मचे मालक जिजाबराव पाटील याना १३ सप्टेंबर २०२४ रोजी…

वार येथे जयहिंद एनएसएसचे विशेष हिवाळी शिबिर १ ते ७ जानेवारी दरम्यान पार पडले
जयहिंद हायस्कूल संलग्न जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे (एनएसएस) विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन १ ते ७ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. हे शिबीर धुळे जिल्ह्यातील वार तालुक्यात असणाऱ्या केंद्रीय आश्रम शाळेत मोठ्या उत्साहाने पार पडले.१ जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती कल्याणी पाटील (महिला पोलीस उपनिरीक्षक,…

४०० रुपयांची लाच पडली महाग , वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले
वीज वितरण कंपनीचा एक वरिष्ठ तंत्रज्ञ, जितेंद्र वसंत धोबी (वय ३३), याला लाच घेताना शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून त्याच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरवाडे येथील एका रहिवाशाने आपल्या घराच्या बांधकामात अडथळा ठरणारी वीज वायर हटवण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला…

एस एस व्ही पी एस महाविद्यालयात ‘एनईपी फॉर स्टेक होल्डर्स’ याविषयावर झाली कार्यशाळा
धुळ्यातील एस एस व्ही पी एस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष व इंग्रजी विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी ‘एनईपी फॉर स्टेक होल्डर्स’ या विषयावर एका दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी कबचौ,जळगाव मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ…

वडजाईत राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि एस.एस. व्हीं. पी. संस्थेचे साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन ६ जानेवारी २०२५ रोजी वडजाई गावात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मनोहर पाटील होते. यावेळी…

नेर येथे विविध कामांचे भूमीपुजन
धुळे- नेर जि.प.गटाचे सदस्य आनंदराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने नेर जि.प.गटातील विविध गावांमध्ये विकास कामांचे भूमीपुजन करण्यात आले.त्यात अमरधाम बैठक व्यवस्था बांधकाम करणे,पेव्हर ब्लॉक बसविणे, अंगणवाडी बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांनी सुमारे 55 लक्ष रुपयाचा निधी विविध योजनेतून मंजूर केला आहे. आ.अमरिषभाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून भदाणे…

अक्कलपाडा धरणाच्या पाटाच्या दुरुस्तीचे सर्वक्षण
अक्कलपाडा धरणाच्या पांझरा नदीवरील शिवकालीन फड पाट ,रायवट पाट , जुने , नवे भदाणे, नेर, लोंढा या भागातील सर्व पाट जीर्ण झाले असून पाट, चाऱ्या , मोऱ्या धरण आणि पांझरा नदीत पाणी असुनही शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे सर्वत्र नादुरुस्त झालेल्या पाट चाऱ्या असून त्या त्वरित दुरुस्तीचे सर्वेक्षण होऊन परीपूर्ण पणे अंदाजपत्रक तयार करण्यात…

धुळ्यात प्रवाश्याला लुटणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह केली अटक , धुळे तालुका पोलिसांची कामगिरी
नाशिकहून धुळे मार्गे जळगावकडे जाणाऱ्या प्रवाशास लुटणाऱ्या अट्टल चोरट्याला तालुका पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. वसिम उर्फ वड्या सलीम रंगरेज राहणार धुळे , असे ह्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून मोबाइलसह ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तेजस महेंद्र सोनवणे रा. दापोरे जि . जळगाव हे आपल्या बलेरो कार ने नाशिकहून जळगावकडे जात असताना…
धावत्या बसमध्ये महिलेची प्रसूती
नाशिकहून नंदुरबारकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एक आदिवासी महिलेची प्रसूती झाली. ही घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी सटाणा रस्त्यावर घडली. बसचालक, महिला वाहक, पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाश्यांच्या मदतीने महिला आणि तिच्या बाळाला सटाणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि दोघेही सुखरूप आहेत. बागलाण तालुक्यातील वडे दिगर येथील अजित पवार आणि त्यांची पत्नी पूजाबाई…

अक्कलपाडा पाटाची दुरुस्ती करा ! नेर ग्रामस्थांची मागणी
धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये जाणारा शिवकालीन रायवट फड पाट आणि पाटचाऱ्यांची स्थिती खूप खराब झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होणे आणि खिडक्यांचा पूर्णपणे तुटलेला असणे, यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. या समस्या अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत आणि त्या त्वरित दुरुस्त कराव्या अशी मागणी नेरचे माजी सरपंच, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव…