
महाराष्ट्र

राज्यातील आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 करा : जिल्हा भाजपा शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
राज्यातील आश्रमशाळांची वेळ सकाळी 8:45 ते 4 अशी आहे. सध्या कडाक्याचा थंडीने सारेच हैराण आहेत. ही वेळ अमानवीय असून विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांना मानासिक तसेच शारिरीकदृष्ट्या आणि शालेय अध्ययन, अध्यापन दृष्टीने उचित नसून ती बदलविण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धुळे जिल्हा भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष बबनराव…

थाळनेरमध्ये होमगार्ड संघटनेच्या ७८ व्या वर्धानपन दिनानिमित्त सात दिवसाचे स्वछता अभियान
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील निष्काम सेवेचे व्रत घेतलेल्या होमगार्ड संघटना स्थापनेला ७८ वर्ष पूर्ण झाल्याने होमगार्ड पथकाने ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर, सात दिवस स्वच्छता अभियान राबवून सप्ताह उत्साहात साजरा केला. मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांची संघटना स्थापन केली. सण,उत्सव,निवडणुका,…

अक्कलपाडा धरणातून पाणी सोडा : अकलाडच्या सरपंचांनी दिले निवेदन
धुळे : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे व पाणी वापर संस्थांना पाणीपट्टी भरण्याचे आदेश करावे असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी उपअभियंता के एस बांगर यांना अकलाडचे सरपंच अजय माळी व भदाण्याचे माजी सरपंच कृष्णा खताळ यांनी दिले. अजूनही पाटबंधारे विभागातर्फे पाणी वाटपाचे नियोजन तसेच वेळापत्रक जाहीर केले गेले नाही….

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोंडाईचा पोलिसांची कारवाई
दोंडाईचा पोलसांनी घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनी आणखी एका साथीदारासह दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली असून चोरी केलेला ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी शंकर मनोहरलाल खत्री हे आपल्या परिवारासह दिल्ली येथे…

धुळ्याचे आ.अनुप अग्रवाल यांनी घेतली ना. नितीन गडकरी यांची भेट
धुळ्याचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी नागपूर अधिवेशन काळात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन धुळ्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले. ज्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पारोळा रोड चौफुली ते बाळापूर फागणे पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्याची विनंती केली. कारण हा रस्ता फागण्यापासून पुढे चौपदरी आहे….

शरद पवार आणि राहुल गांधी करणार मारकडवाडीतुन ईव्हीएमविरोधात लाँगमार्च
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीयेथे भाजपचे राम सातपुते हे निवडून आले. यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे जानकर आणि मोहिते पाटील यांनाच मताधिक्य देण्याचा गावकऱ्यांचा दावा असल्याने त्यांनी ई व्ही एमवर संशय दाखवीत पुन्हा मतदान घेण्याचा आग्रह केला. प्रशासनाने नकार दिल्यावर सुद्धा मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठरवून तशी तयारीही केली. मतदान पेट्या,…

पांझरा नदी पुलावर डीजे वाहन आणि दुचाकीचा अपघात ; दुचाकी चक्काचूर पण सुदैवाने जीवित हानी टळली
धुळे शहरातील नकाणे रोडलगत पांझरा नदी पुलावर डीजे वाहन एका दुचाकी वर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. बुधवारी, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी हि घटना घडली. गाडीचा अचानक ब्रेक न लागल्याने ती जागेवरच पलटी झाली आणि दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डीजे वाहन आणि एक्टिवा दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे….

अपघातानंतर अटक न करण्यासाठी मागितली लाच ; एक हवालदार ताब्यात एक फरार
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन दुचाकीस्वरांच्या झालेल्या अपघातात एकाने जीव गमावला. दुसऱ्या दुचाकीस्वारांवर घुंह नोंदविण्यात येत असताना २ पोलीस हवालदारांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून एका पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले असून दुसरे फरार झालेत. तक्रारदार हे दि. 7 नोव्हेंबर रोजी मोटार सायकल ने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर…

पिंपळनेरमध्ये रविवारी शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने रविवार, 1 डिसेंबर,2024 रोजी साई कृष्णा रिसार्ट, पिंपळनेर, साक्री येथे शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली,शासकीय सेवा व योजनांच्या मेळावानिमित्त पूर्वतयारी आढावा…

धुळ्यात थंडीचा जोर वाढला, स्वेटर खरेदी करणाऱ्यांची झाली गर्दी
धुळ्यात अचानक वातावरणात गारवा वाढलाय. थंडीने हुडहुडी भरतेय. तापमान साधारणतः १० डिग्री सेल्सिअस घसरले असून हे तापमान ८ ते ९ डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षीही धुळ्यातले तापमान ७ डिग्री सेल्सिअसच्या खाली गेले होते. हवेमध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला असल्याने थंडीचा जोर आणखीच वाढलाय. वाढत्या थंडीमुळे रात्री लवकर शहरातील रस्ते निर्मनुष्य…