
साक्री तालुक्यातील वीटाई गावाजवळ जंगलात भीषण आग! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वीटाई (ता. साक्री) | साक्री तालुक्यातील वीटाई गावाच्या परिसरातील जंगलामध्ये लागलेल्या आगीने गुरुवारी (११ एप्रिल) रात्री ७.३० वाजता रौद्र रूप धारण केले. आग नेमकी केव्हा लागली हे स्पष्ट नसले तरी रात्रीच्या अंधारात तिच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण वीटाई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपूर्वीच साक्री तालुक्याच्या देरमाळ डोंगर भागात…