वयोवृद्ध आजोबांनी हरवलेला मोबाईल मालकाला केला परत,प्रामाणिकपणाचे असे ही उदाहरण..

आपल्याला मिळालेला मोबाईल पोलिसात जमा करून त्याच्या मूळ मालकाला परत करणाऱ्या आजोबांचे सर्व स्तरातून सध्या कौतुक होतेय.. झाले असे कि ,दोंडाईचा येथील पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे ऋषिकेश छोटूलाल सांगळे रा.गोपालपुरा दोंडाईचा ता. शिंदखेडा यांच्या मालकीचा रेडमी कंपनीचा मोबाईल दि. २४ सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान शहरात हरवला होता. हा मोबाईल सुभाष दगडू भावसार यांना…

Read More

दोंडाईचा गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च…

गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहरात पोलिसांनी रूट मार्च केले. शहरातील मानाच्या गणपती विसर्जन मार्गावर तसेच संवेदनशील भागात रूट मार्च करण्यात आला होता. रुट मार्च हा पोलीस ठाणे पासून सुरू होऊन गोविंद नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, अभिषेक चित्रमंदिर, भोई वाडा, आझाद चौक, सोनार गल्ली मार्गे एकता चौक करून पोलीस ठाणे येथे समाप्त झाला. गणेशोत्सव काळात…

Read More

दहा वर्ष उशीरा का होईना 18 हजार कोटींच्या मनमाड इंदोर रेल्वेमार्गाला अखेर मंत्री मडळांची मंजुरी

12 डिंसेबरच्या अभूतपूर्व आंदोलनातील आंदोलकांचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मानले आभार मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान मोदी, स्व. राम जेठमलानी यांच्या प्रदीर्घ संघर्षातून 100 वर्षाचे स्वप्न साकार धुळे मालेगाव जिल्हयाचे भाग्य बदलण्याची शक्ती असलेल्या 18,036 हजार कोटी रूपयांच्या रेल्वेमार्गास आज केर्दीय मंत्री मंडळाने एक मुखी मान्यता दिली. तब्बल 45 वर्षापूर्वी स्वर्गीय शरद जोशींच्या अध्यक्षते खाली…

Read More

धुळ्यातील प्रा.डॉ. पंडित घनश्याम थोरात ठरले “पद्मश्री” साठी नॉमिनी

धुळे : गेली अनेक वर्षे ट्रॅफिक सेन्स,सामाजिक न्याय,शिक्षण या विषयाशी मनस्वी बांधिलकी जपत आपल्या अभ्यास पूर्ण वक्तृत्वाने आणि प्रतिभासंपन्न गायनाद्वारे हजारो लाखो लोकांना अविरत पणे विवेकवादाचे प्रबोधन करणारे विधी अभ्यासक, प्रसिद्ध रंगकर्मी, मानसतज्ञ, प्रा. डॉ. पंडित घनश्याम पुंडलिक थोरात हे संपूर्ण धुळे जिल्हयातून देशाच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारा साठी एकमेव नोमिनी ठरले आहेत. धुळे…

Read More

शिंदखेड्यात दिला भिल्ल समाजाने विकास आणि परिवर्तनाचा नारा

धुळे जिल्यातील शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने ९ऑगस्ट जागतिक अदिवासी गौरव दिनानिमित्तपरिवर्तन सभा घेण्यात आली. दि, १३ ऑगस्ट रोजी बिजासनी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिल समाज विकास मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष दिपक अहिरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मध्ये आदिवासी समाजाच्या हक्क आधिकार शिक्षण,आरोग्य ,व्यसनमुक्त ,समाज, जल जंगल…

Read More

तिरुपती नगर रहिवाश्यांनी आयुक्तांच्या दरबारात मांडली रस्त्याची व्यथा

तात्पुरत्या सोयीसाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश धुळे : शहरातील वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरातील रहिवाशांनी महापालिकेच्या आयुक्त अमिता पाटील यांच्या दरबारात रस्त्याच्या समस्येविषयी व्यथा मांडली. यावेळी आयुक्त पाटील यांनी सहाय्यक अभियंता यांना रहिवाशांची पावसाळ्यात तात्पुरती सोय होण्यासाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याची निर्देश दिले.वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरात पावसामुळे नागरिकांना रहदारीसाठी रस्ताच…

Read More

विकास कामांच्या आढावा बैठकीला आ. जयकुमार रावल, आ.फारूक शहा यांच्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांची दांडी

खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी दिल्यात सूचना, जिल्ह्यातील विविध विकास कामांवर झाली चर्चा धुळे – लोकसभा निवडणूक संपली आणि आता खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी कामाला सुरुवात केलीय. ६ जुलै ला जिल्ह्यातील विकास कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मात्र विषय शहरासह जिल्ह्याच्या विकासाचा असताना या बैठकीला आ. फारूक शहा, आ. जयकुमार रावल यांनी…

Read More

शहाद्याचे बसस्थानक नव्हे, हे तर समस्यांचे ‘आगार’

शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकाची खड्डांमुळे अतिशय दुरावस्था झाली असून बसस्थानकात जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या पाण्याच्या डबक्यांना चिखलाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अशातच प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी याच पाण्याच्या डबक्यांमधून मार्ग काढत लागावा लागतत आहे. दुसरीकडे प्रवाश्यांना बसस्थानकात उभे राहण्यासाठी देखील जागा नसून साचलेल्या पाण्याच्या डबक्यामधुन दुर्गंधी आणि रोगराई पसरत असल्याचे चित्र आहे….

Read More

सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.संजीव गिरासे

धुळे : उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या बाविसाव्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथे एकदिवसीय राज्यस्तरीय बाविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी खानदेशातील कथा, कादंबरीकार व आदिशक्ती धनदाईमाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांची निवड करण्यात…

Read More

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवा, युवा सेनेची शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी

धुळे : इयत्ता १०वी – १२वीचे निकाल लागून दोन तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र धुळ्यातील अनेक महाविद्यालये प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करताना दिसत आहेत. या बाबत विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकारी आणि युवा सैनिकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज…

Read More
Back To Top