धस आणि जरांगेच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण …
मध्यरात्रीनंतर अंतरवाली सराटीत असं काय घडलं?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची उमेदवारी यादी निघण्यापूर्वी भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.रात्री एक वाजता सुरेश धस हे अंतरवलीत दाखल झाले. यावेळी जवळपास अर्धा तास या दोघात बातचीत झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने या भेटित काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त करून रणशिंग फुंकले आहे.. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे.दरम्यान, मनोज जरांगे यांची मनधरणीचे प्रयत्न महायुतीच्या नेत्याकडून केल्या जात असल्याची चर्चा आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. त्या पाठोपाठ आता भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. रात्री एक वाजता सुरेश धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने या भेटित नेमकी काय चर्चा झाली ,हे मात्र अद्याप समोर आले नाही.