देशाची सुरक्षितता धोक्यात, धुळ्यात आतंकवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला निषेध

धुळे – देशातील वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या निषेधार्थ आज धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले.
गेल्या दीड महिन्यांपासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी आपला तिसरा कार्यकाळातील पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लागलीच दहशतवादी कारवायांनी डोके वर काढले. गेल्या दीड महिन्यात अनेक आतंकवादी हल्ल्यात एकट्या जम्मू विभागात एप्रिल ते जुलै पर्यंत बारा जवान व दहा नागरीक शहीद झाले आहेत. या भागात अतिरेक्यांच्या अनेक टोळ्या सहभागी असून या अतिरेक्यांना कंठस्थानी घालण्यात अद्यापही यश आलेले नाही,मोदी सरकारचे हे अपयश असून काश्मीर नंतर आता अतिरेक्यांनी जम्मू विभागाला टार्गेट केल्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. असा आरोप करत या घटनांच्या निषेधार्थ आज धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले.
या अतिरेक्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून या दहशतवादी कारवाया देशाच्या संरक्षण विभागाने युद्ध पातळीवर थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करीत जुन्या महानगरपालिका चौकात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
या वेळी संपर्कप्रमुख महेश मिस्त्री,जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे ,मा.आ.शरद पाटील, किरण जोंधळे ,धीरज पाटील , डॉ सुशील महाजन , देविदास लोणारी, भरत मोरे, ललित माळी, व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे,धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares