बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी ड्रोनने हत्यारे मागवली

महाराष्ट्रातील विख्यात राजकारणी बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या झाली. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी, त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयातून बाहेर जात असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर ३ गोळ्या झाडून आरोपी फरार झाले. या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला.या हायप्रोफाईल हत्येमुळे मोठी खळबळ माजली आहे. मुंबई क्राईम…

Read More

धुळे हद्दीत गुजरातहुन येणाऱ्या ३० ट्रॅव्हल्सची पोलिसांनी पहाटे केली अचानक तपासणी

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिस प्रशासन चांगलेच ऍक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा अवैध वस्तूंची तसेच पैशांची वाहतूक अवैध मार्गाने होऊ नये यासाठी जिल्हाभरात यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पोलिसांनी धुळे – सुरत मार्गावर आपला ताफा वळविला. गुजरातहून धुळ्याकडे येणाऱ्या तब्बल…

Read More

पावसाने झोडपले, सरकारने सावरावे,देऊर परिसरातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन

धुळे जिल्यातील देऊर खु. , देऊर बु., नांद्रे परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, आम्ही २०२४ खरीप हंगामातील कापूस,कांदा,मका या पिकांसाठी मुदतीत प्रधानमंत्री पीकविमा योजनेला अर्ज भरला आहे. मात्र, मागील १५ दिवसात परतीच्या पावसाने आमच्या पिकांचे अतोनात नुकसान केले.. कपाशीची बोन्डे काळी पडलीत, कपाशी…

Read More

बालरंगभूमी परिषद आयोजित दिव्यांग मुलांचा “यहा के हम सिकंदर” महोत्सव धुळ्यात संपन्न

बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखा नियोजित यहा के हम सिकंदर हा दिव्यांग मुलांचा विविध कलागुणांचा महोत्सव दि २२ ऑक्टोबर रोजी शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिरात जल्लोषात संपन्न झाला या महोत्सवात जिल्ह्यातील 17 दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री देखील यावेळी…

Read More

धुळे कोर्टातील नवीन इमारतीत बसायला जागा नाही म्हणून वकीलसंघातर्फे निषेध करून एक दिवसाचा बंद पाळण्याचा निर्णय

उद्याच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार करत वकिलांचा धुळ्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगमध्ये वकिलांना बसायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने होणाऱ्या धुळे जिल्हा न्यायालय नुतन इमारतीच्या बांधकामाच्या उदघाटन कार्यक्रमावर उद्या दि.२३ रोजी वकिलांनी लालफित लावून प्रशासनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. धुळे बार असोसिएशनचा कोणताही सभासद या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही. कार्यक्रमस्थळी वकील सदस्य…

Read More

तावखेडा परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत

बिबट्याने वासरू केले फस्त नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा परिसरात बिबट्याने थैमान घातलेय. शेतात बांधलेल्या एका वासराला बिबट्याने फस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तावखेड्यात राहणारे दिलीप खंडेश्वर कुलकर्णी यांनी आपल्या शेतात बांधलेल्या ८ गुरांपैकी एक वासरू बिबट्याच्या हल्ल्यात गमावले. २२ ऑक्टोबर मंगळवार रोजी मध्यरात्री बिबट्याने…

Read More

पाण्याची मोटर चोरी करणारे अट्टल चोरटे जेरबंद

शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे शिवारातील शेतातून पाण्याची मोटर चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६८ हजार किमतीच्या ५ मोटर जप्त करण्यात आल्या आहेत. शेतकरी प्रियदर्शन काशिनाथ बागले यांची ब्राह्मणे शिवारातील शेतातून पाण्याची मोटार चोरीस गेल्याची तक्रार ३१ जानेवारी २०२४ रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक…

Read More

दोंडाईचा पोलिसांची कामगिरी : ५ दिवसात ७ ठिकाणी कारवाया करून ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

दोंडाईचा – शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाणे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या ५ दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून पोलिसांनी हि कारवाई केली.दोंडाईचा शहरातील मेहेतर कॉलनी भागात सुशीला अशोक नेतले हि महिला हातभट्टीची दारूविक्री चा व्यवसाय करत होती. तसेच गोपाळपुरामधील दारूविक्री करणारा महेंद्र शिवराम पवार, निमगूळ गावातील रेखाबाई नानाभाऊ भील, कुरुकवाडे…

Read More

भाजपच्या पहिल्या यादीत कोणा कोणाला मिळाली संधी ..

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीदसाठी भाजपाने आज पहिली यादी जाहीर केली आहे . यात पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. यादी बाबत प्रचंड उत्सुकता होती, अखेर आज २० ऑक्टोबर रोजी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने पहिली यादी जाहीर केली. यात बघू या कोणा कोणाला संधी मिळाली ते… भाजपची पहिली उमेदवार यादी अशी – नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस,…

Read More
Back To Top