धुळ्यात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह इसम जेरबंद

धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. धुळे शहर डिटेक्शन ब्रँच (डी. बी. पथक)च्या या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश झाला आहे.धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याजवळ एक इसम गावठी…

Read More

संभाजीनगर मधील गुंतवणुकीचा लाभ घ्या – भास्कर मुंडे

संभाजीनगरमध्ये येणाऱ्या मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा लाभ धुळे शहराने घ्यावा, असे प्रतिपादन डीएमआयसीचे संचालक भास्कर मुंडे यांनी केले. टोयोटा किर्लोस्कर, पिरामल फार्मा, आयएसडब्लू ग्रीन मोबिलिटी, ऐथर एनर्जी या मोठ्या उद्योग समूहांनी संभाजीनगरमध्ये ₹६०,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याचे निश्चित केले असून, याचा व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. धुळे व्यापारी महासंघाच्या बिझनेस फोरमच्या वतीने संभाजीनगर…

Read More

धुळे शहरातील देवपूर उपनगरातील जागा अतिक्रमणमुक्त करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

धुळे शहरातील देवपूर उपनगरात वीट भट्टी परिसरात जागेवरील अतिक्रमणाबाबत धुळे महानगरपालिका व महसूल प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीतून कालबद्धरित्या अतिक्रमण काढण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. धुळे शहरातील देवपूर उपनगरातील अतिक्रमित जागेबाबत सदस्य अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना महसूल मंत्री बावनकुळे…

Read More

देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात “निर्मिती 2025” परिषद आयोजित

देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय, निर्मिती 2025 मध्ये ऊर्जा कार्यक्षम आणि शाश्वत वायुवीजन (Energy Efficient and Sustainable Ventilation) या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत श्री. समीर बहाळकर (श्री. एलिमेंटस) यांनी ‘हरित इमारतींमधील शाश्वत पद्धती’ (Sustainable Practices in Green Buildings) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ऊर्जा कार्यक्षम वायुवीजन प्रणालीचे महत्त्व स्पष्ट करत, श्रोत्यांना हरित…

Read More

साक्री बस स्थानकात मोफत शुद्ध पाणपोईचे आयोजन

साक्री बस स्थानकात दरवर्षी प्रमाणे यंदाही तहानलेल्या प्रवाशांसाठी मोफत शुद्ध पाणपोईचे आयोजन करण्यात आले आहे. साई भक्त श्री. अजय सोनवणे यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबवला जात असून, यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात थंड व शुद्ध पाण्याचा लाभ मिळणार आहे. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. तुळशीरामजी गावित, लोकनियुक्त भांडणे गावाचे सरपंच साईभक्त अजय सोनवणे ,गट नेते…

Read More

गावात मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग – परंपरेला दिला नवा अर्थ

“वंशाचा दिवा असलाच पाहिजे” या सामाजिक दृष्ट्या बांधिलकी असलेल्या परंपरेला छेद देऊन सावित्रीच्या लेकींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग देत नवा आदर्श निर्माण केला. या कार्यामुळे संपूर्ण गावात व परिसरात समाधान आणि कौतुक व्यक्त केले जात आहे. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील आदर्श शेतकरी देवराम चिंधा देवरे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दिनांक १९ रोजी सकाळी ६…

Read More

दोन हॉस्पिटल्ससह सोनोग्राफी सेंटरला बजावली नोटीस , अचानक भेटीत आढळल्या त्रुटी

जिल्ह्यात 4 हॉस्पिटल, 16 सोनोग्राफी व 8 एमटीपी सेंटरची तपासणी गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारित 2003 ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा याकरीता महसूल, आरोग्य व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने धुळे जिल्ह्यातील सोनोग्राफी, एमटीपी व प्रसूतीगृहांची धडक मोहीमेतंर्गत तपासणी करण्यात आली. या तपासणीत 2 हॉस्पिटल व…

Read More

धुळे जिल्ह्यात 1 एप्रिल पासून सर्व बँकाचे कामकाज 10 वाजता सुरु होणार

नागरिकांच्या सोईसाठी व बँकिग सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने 1 एप्रिल, 2025 पासून धुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी तसेच सहकारी बँकांच्या शाखांचे कामकाज सकाळी 10.00 वाजता सुरु होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सोईसाठी व बँकिग सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने 1 एप्रिल, 2025 पासून सर्व बँक शाखांसाठी हे वेळापत्रक…

Read More

थकित देयके व NPS हप्ता जमा होणेबाबत शिक्षक परिषदेने दिले निवेदन

धुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी थकित वेतन देयक मंजुरीसाठी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर केले असले तरी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये त्रुटी असलेल्या प्रस्तावांसाठी सूचना देण्यात आल्या असतानाही, धुळे जिल्ह्यात मात्र मंजुरी किंवा त्रुटींबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी जानेवारी २०२५…

Read More

ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत प्रा. मा. म. देशमुख यांचे हृदय विकाराने निधन

नागपूर: ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे बुधवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. दुपारी ४ वाजता त्यांच्या सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके वादग्रस्त ठरलीत. प्रा. मा.म. देशमुख हे शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले. शिक्षणाची त्यांना प्रचंड आवड होती. प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरीट उत्तीर्ण झाले होते. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय…

Read More
Back To Top