
दिव्यांग श्रेयसच्या पायात भरले बळ,नंदुरबार पोलीस प्रशासनाची माणुसकी
पोलीसांबद्दलचं सर्वसामान्यांच्या मनात फारसे चांगले मत नसते परंतु नंदुरबार पोलीसांनी मात्र याला वेळोवेळी छेद दिला आहे. श्रेयस दिलीप नांदेडकर वय ३५.शिक्षण बारावीपर्यंत तो जन्मतःच संपूर्ण दिव्यांग! हात व पाय ठार लुळे.असून नसल्यासारखेच..उभा रहाता येत नसल्याने सतत बसूनच रहावे लागते. दुसऱ्यांनेच उचलून न्यावे लागते. बोलतांना अडखळत बोलतो.परिस्थिती अत्यंत गरीब.नंदुरबार पोलीसांच्या भाड्याच्या गाळ्यात त्याचे वडील दिलीप नांदेडकर…