सरकारी वकीलही आता भाजपचेच राहणार काय ? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर नाना पटोलेंचा सवाल…

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ऍड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर लगेचच भाजपने त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला असून ‘आता सरकारी वकील ही भाजपचेच राहणार’ हेच भाजपने सिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा ही…

Read More

धुळे तालुक्यातील सरपंच पदासाठी सोमवारीआरक्षण सोडत

धुळे तालुक्यातील अनुसुचीत क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायती करीता अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता सन 2025-2030 या कालावधीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार, 7 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, धुळे ग्रामिण येथे आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांनी एका…

Read More

नटराज टॉकीजजवळील भंगार गोडाऊनला भीषण आग

धुळे: नटराज टॉकीज लगत असलेल्या अन्सारी पुठ्ठा भंगार दुकानास अचानक आग लागल्याने संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. अधिक तपास प्रशासनाकडून सुरू आहे. -प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Read More

साक्रीत गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

गुढीपाडवा व हिंदू नववर्षदिनानिमित्त श्रीराम मंदिर संस्थान साक्री, हिंदू जनजागरण समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत शहरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिर येथील नवीन ध्वज पूजनाने झाली. संस्थानचे अध्यक्ष श्रीकांतभाई भोसले आणि विजय भोसले यांच्या हस्ते हा विधी पार पडला. यानंतर श्रीराम…

Read More

उबाठा युवासेनेच्या CET मॉक टेस्ट अभियानास धुळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद !

धुळे जिल्ह्यात इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी आणि विधी क्षेत्रात प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या CET परीक्षेच्या तयारीसाठी उबाठा युवासेनेतर्फे राज्यभर आयोजित मोफत मॉक टेस्ट अभियानास जोरदार प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाअंतर्गत 29 मार्च 2025 रोजी धुळे येथील जयहिंद सिनियर कॉलेज आणि महाजन हायस्कूल येथे सराव परीक्षा घेण्यात आली, ज्यामध्ये 750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. CET परीक्षेच्या स्वरूपाची योग्य तयारी करण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल: माध्यमांतील बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी परिपत्रक जारी

मुंबई, दि. 28 मार्च – राज्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश…

Read More

राज्यातील ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण

मुंबई, दि. २८: राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेअंतर्गत २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनुदानाचे वितरण करण्यात आले. या योजनेतर्गत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे अनुदान गोशाळांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार…

Read More

सिल्लोडमध्ये अमानुष अत्याचार; दत्तक घेतलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीची हत्या

छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील मुगलपुरा परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दत्तक घेतलेल्या मुलीची हालहाल करून हत्या –प्राथमिक माहितीनुसार, हत्या झालेल्या मुलीचे नाव आयत फईम शेख असे असून, तिला…

Read More

धुळ्यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या शोभायात्रेचे भव्य आयोजन

धुळे : विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने रविवार, 30 मार्च 2025 रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिर येथून सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार आहे. हिंदू नववर्ष स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील प्रभावशाली मठ, मंदिर आणि व्यायामशाळा…

Read More

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क हटवले; शेतकऱ्यांना दिलासा

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णतः हटवले असून, त्यामुळे कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली असून पोषक हवामानामुळे उत्पादनही जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर घसरण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. त्यानुसार, राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे पणन मंत्री…

Read More

धुळ्यात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह इसम जेरबंद

धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. धुळे शहर डिटेक्शन ब्रँच (डी. बी. पथक)च्या या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश झाला आहे.धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याजवळ एक इसम गावठी…

Read More
Back To Top