
देऊरला ठाकूर वॉरियर्स आणि योगेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा भव्य सांस्कृतिक आविष्कार
धुळे : देऊर बुद्रुक येथील धर्मराज विद्याप्रसारक संस्थेच्या ठाकूर वॉरियर्स आणि योगेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘हृदय रंग’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अप्रतिम सांस्कृतिक कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. हिंदी, मराठी, अहिराणी देशभक्तीपर गीते, कोळीगीते आणि महाकुंभ यांसारख्या विविध कलाप्रकारांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या…