शिरूड-बोरी परिसरासाठी गिरणा डावा कालव्यातून लवकरच रब्बीसाठी आवर्तन- कुणाल पाटील

धुळे तालुक्यातील शिरूड – बोरी परिसरासाठी गिरणा पांझण डाव्या कालव्यातून लवकरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री कुणाल पाटील यांनी सांगितले. दरम्यान शिरूड बोरी परिसरासाठी पाणी सोडावे याकरिता श्री कुणाल पाटील यांनी गिरणा पांझण डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता, उप अभियंत्यांशी नुकतीच चर्चा करून पाणी सोडण्याबाबत मागणी केली. गिरणा…

Read More

दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर आता ड्रोनची नजर

धुळे : दहावी, बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून हे कॉपीमुक्त अभियान धुळे जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्याबरोबरच त्यांचे पालक, शिक्षक आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. दहावी, बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज दक्षता समितीची बैठक…

Read More

धुळे देवपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीचे गुन्हे आणले उघडकीस

धुळे : देवपूर पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यातील आरोपींना तपास पथकाने यशस्वीपणे ताब्यात घेतले असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिराबाई नरहरी सोनार (वय ६४), मागदेव बाबा मंदीर, विटाभाटी, देवपूर येथील रहिवासी यांनी पोलिसांकडे तक्रार केली की, त्यांच्या…

Read More

धुळ्यात ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनला, विश्वविजेती मेरी कोम यांची भेट

विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांनी धुळे येथील ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनला भेट दिली. धुळे मॅरेथॉन २०२५ – सीझन ३ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मेरी कोम यांनी विशेष वेळ काढून छात्रसैनिकांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीमुळे कॅडेट्सना उच्चतम प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या मनोबलात मोठी वाढ झाली. या भेटीवेळी ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर…

Read More

कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे : प्रा शरद पाटील

धुळे: खान्देश विभागासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना धुळे येथे करावी, अशी मागणी आमदार प्रा. शरद पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. साक्री रोडवरील या पत्रकार परिषदेला माजी आमदार शरद पाटील, अ‍ॅड. प्रकाश पाटील, कैलास पाटील, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. हवामानातील बदल आणि जमिनीची घटती सुपीकता लक्षात घेता पिक पद्धतीत मोठे बदल होत आहेत. या…

Read More

जीबीएस’च्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करा

धुळे – प्रतिनिधीराज्यात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ची रुग्ण संख्या वाढत असुन गुलेन बारे सिंड्रोम आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करावी. असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.आज १ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन समिती सभागृहात गॅलेन बारे सिंड्रोम आजाराबाबत बैठक झाली. या बैठकीस आमदार अमरिशभाई…

Read More

सोनगीर पोलिसांनी उघडकीस आणली पतपेढीतील चोरी, 2 किलो 300 ग्रॅम चांदी हस्तगत

सोनगीर पोलिसांनी विठठल रुखमाई नागरी सहकारी पतपेढीतील चोरी उघडकीस आणली आहे. 13 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी पतपेढीच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून चांदी चोरून नेली.सुरुवातीला पोलिसांना या चोरीचा मागोवा घेणे कठीण जात होते. पण, तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्ही फुटेजमधून चोरांनी वापरलेली पांढऱ्या रंगाची ह्युंडाई एक्सेंट कार ओळखली. पोलिसांनी त्या…

Read More

महाराष्ट्र बनलं ‘पहिलं पाऊल’ टाकणारं राज्य!

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा गेमचेंजर प्रवास सुरू! महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाला दिशा दाखवली आहे! गुन्हे सिद्धतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या व्हॅनचे लोकार्पण सह्याद्री अतिथीगृह येथे उत्साहात पार पडले. ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ म्हणजे काय?आता गुन्हेगारांना वाचण्यासाठी कोणतीही पळवाट मिळणार…

Read More

धुळे तालुक्यातल्या सोनवाडी शिवारात 1 लाख रुपयांच्या घरफोडीचा थरार, आरोपी गजाआड!

धुळे जिल्ह्यातल्या सोनवाडी शिवारात एका 75 वर्षीय वृद्धाचा शेतातील घर फोडून 1 लाख रुपये लंपास झाल्याची घटना घडली होती. ही घटना 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घडली. बद्रीनाथ दामू निकम हे वृद्ध शेतात शेतीकाम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील घराचा दरवाजा फोडून पेटीत ठेवलेले 1,00,000/- रुपये चोरले.घटनेची तक्रार मिळताच धुळे…

Read More

वाघाड येथे पाणलोट रथ यात्रेचे नियोजन आणि विविध उपक्रमांसाठी विशेष ग्रामसभा संपन्न

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 अंतर्गत वाघाड (तालुका दिंडोरी) येथे मंगळवारी (दि. 21 जानेवारी 2025) सकाळी 9 वाजता सरपंच सौ. आशा गांगोडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत केंद्र व राज्य शासनाच्या पाणलोट विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने पाणलोट रथ यात्रेचे नियोजन सविस्तर मांडण्यात आले. ग्रामसभेत अनिल मधुकर शिंगाडे यांची ‘पाणलोट योद्धा’ म्हणून…

Read More
Back To Top