

सरकारी वकीलही आता भाजपचेच राहणार काय ? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर नाना पटोलेंचा सवाल…
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ऍड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर लगेचच भाजपने त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला असून ‘आता सरकारी वकील ही भाजपचेच राहणार’ हेच भाजपने सिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा ही…

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – जयकुमार रावल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, सिंचन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, दळणवळण, पर्यटन, उद्योग आदी क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः शेतकरी, महिला, युवक, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी आणि दिव्यांग घटकांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्याच्या विकासाला गती देणारा हा शेतकरी केंद्रित…

घरफोडी प्रकरणातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तिसरा फरार
दोंडाईचा शहरातील घरफोडीच्या एका गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, तिसरा अद्याप फरार आहे.दोंडाईचा येथील गोविंद नगर येथे राहणाऱ्या रुक्साना शेख शहीद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या उपचारासाठी धुळ्यातील सरकारी रुग्णालयात भरती होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा…

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तिघांना चिरडले !
रस्त्याच्या कडेला थकून झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवार दि. ११ मार्च रोजी पहाटे जळगावमधील नशिराबादजवळ घडली. दिवसभर श्रम करून थकलेल्या या मजुरांनी फक्त काही तासांची विश्रांती घेतली, मात्र एका अज्ञात वाहनाने झोपलेल्या अवस्थेत त्यांना चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. नशिराबादजवळील खुर्द गावात सध्या पुलाच्या कामासाठी अनेक परप्रांतीय मजूर काम करत आहेत….

धुळे : खाकीतील उत्कृष्ट महिला कर्मचाऱ्यांचा महिलादिनी सन्मान
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून खाकी वर्दीतील उकृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा आज जागतिक महिलादिनी सन्मान करण्यात आला . जिल्हाभरातील सर्व पोलिसठाण्याअंतगर्त निवडक महिलांचा अधीक्षक धिवरे यांनी आपल्या कार्यालयात बोलवून सन्मान केला. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढावे हा या मागील उद्देश होता.सन्मानित करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिलांमध्ये पुढील महिला कर्मचाऱ्यांचा…

शरीरसुखाला नकार दिल्यानंतर 36 वर्षीय महिलेवर 19 वर्षीय मुलाकडून हल्ला, 280 टाके
राज्यातल्या महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांनी सगळे हादरून गेले आहेत. पुण्यातलं स्वारगेट प्रकरण ताजं असतानाच, आता छत्रपती संभाजीनगरातली एक घटना अंगाचा थरकाप उडवणारी आहे!एका 19 वर्षांच्या तरुणानं चक्क आपल्या नातेवाईक महिलेलाच क्रूरतेच्या थराला जाऊन सपासप वार केले! कारण काय? फक्त तिनं शरीरसुखाला नकार दिला! ह्या भस्मासुरानं तिच्या शरीरावर इतके वार केलेत की तिला तब्बल 280 टाके…

धुळ्यात दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले जेरबंद!
धुळे: शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून मोठ्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.दिनांक 2 मार्च 2025 रोजी दुपारी 2.20 ते 6.30 या वेळेत फिर्यादी भूषण जीवन माळी (रा. बागुल गल्ली, सोनगीर, धुळे) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 36,000 रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सोनगीर…

धक्कादायक: कौटुंबिक वादातून पत्नीची विष देऊन हत्या
महाराष्ट्रातील गेवराई तालुक्यातील राज पिंपरी येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला विष पाजून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असुन कोमल नागेश पाटोळे असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी कोमल आणि नागेश पाटोळे यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, पती-पत्नीमध्ये वारंवार वाद…

धुळ्यात जबरी चोरी करणारे अटकेत , १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे शहरात झालेल्या जबरी चोरी प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करून दोन आरोपींना अटक केली असून, चोरी गेलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी दिनेश मनोहर शर्मा (वय ३९, व्यवसाय पुजारी, रा. भाईजी नगर, चितोड रोड, धुळे) हे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजता पांझरा नदीकिनारी सिध्देश्वर गणपती मंदीर ते कालिका माता मंदीर दरम्यान…

महिला अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन
धुळे: राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीने धुळ्यात तीव्र आंदोलन छेडले. उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. महिला सुरक्षेच्या बाबतीत सत्ताधारी महायुती सरकारचे अपयश स्पष्ट होत असल्याचे आंदोलकांनी ठणकावले. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अमानुष घटनेनंतर अवघ्या सात दिवसांतच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या…

धुळ्यातील निकम इन्स्टिट्यूट येथे शिक्षक प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे: निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोंदूर येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील १,१०० हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला असून, उर्वरित २,२०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. यावेळी धुळे पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी भरत नागरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “ज्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण…