

सरकारी वकीलही आता भाजपचेच राहणार काय ? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर नाना पटोलेंचा सवाल…
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ऍड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर लगेचच भाजपने त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला असून ‘आता सरकारी वकील ही भाजपचेच राहणार’ हेच भाजपने सिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा ही…

न्यू सिटी हायस्कूल, धुळे येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपयुक्त उपक्रमाचे आयोजन; मान्यवरांचे मार्गदर्शन धुळे | प्रतिनिधीधुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनुजी करनकाळ न्यू सिटी हायस्कूल, धुळे येथे आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. कार्यक्रम प्रसंगी धुळे एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. महेशजी घुगरी, श्री. प्रविण बाफना, इंजि. चेतन…

करजकुपा गावात वारंवार वीज बिघाडांनी शेतकरी त्रस्त; कायमस्वरूपी उपाययोजनेची जोरदार मागणी
नंदुरबार तालुक्यातील करजकुपा गावातील शेतकरी व ग्रामस्थ गेले काही महिने खंडित वीजपुरवठा, भारनियमन आणि वारंवार बिघाडांमुळे त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होतो असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या शेतीला बसत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गावातील वीजपुरवठा सध्या सुंदरदे येथून होत आहे, कारण अवकाळी पावसामुळे काही दिवसांपूर्वी…

गणेश मिसाळ यांची अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती; पश्चिम उपनगर वांद्रे येथे नवी जबाबदारी !
धुळ्यात प्रांताधिकारी आणि उपजिल्हाधिकारी म्हणून सांभाळली जबाबदारी राज्य शासनाच्या आदेशानुसार श्री. गणेश मिसाळ यांची अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली असून, त्यांची नियुक्ती पश्चिम उपनगरे, वांद्रे (अतिक्रमण निष्कासन) या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी दिनांक १० जून २०२५ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला. याआधी त्यांनी महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC), मुंबई येथे सह व्यवस्थापकीय…

मुलांना शाळेत पाठवू या, सारे शिकुया, पुढे जाऊ या..जयघोषाने परिसर दुमदुमला
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासह मान्यवरांनी केले नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचे स्वागत मुला-मुलींना शाळेत पाठवू या, सारे शिकुया, पुढे जाऊया, चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला, आधी रोटी खाऐगे, स्कूल जरुर जाऐगे, बच्चे मांगे प्यार दो, शिक्षा का अधिकार दो… च्या जयघोषात नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा, कुठे बैलगाडीतून तर कुठे बग्गीतून मिरवूणक काढून शाळा प्रवेशोत्सव सोहळा झाला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते…

रायवट पाटाच्या स्वच्छतेचा शुभारंभ, आमदार राम भदाणे यांच्या पुढाकारातून पाट दुरुस्तीसाठी प्रस्ताव
धुळे तालुक्यातील जुने भदाणे गावाजवळून जाणाऱ्या ऐतिहासिक रायवट पाटाची साफसफाई ग्रामपंचायतीच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व नेर गटाचे नेते शंकरराव खलाणे यांच्या हस्ते झाला. पाटाचे स्वरूप व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेल्या या रायवट पाटामार्गे पांझरा नदीचे…

शेतीच्या मशागती वेळी विज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील घटना…
शिरपूर तालुक्यातील ताजपूरी येथील शेतात मशागतीचे काम करत असलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत नथ्थू हारचंद्र सनेर (रा. ताजपूरी) यांचा जागीच मृत्यू झाला. नथ्थू सनेर हे आपल्या आढे शिवारातील शेतात मशागतीचे काम करीत होते. दुपारच्या सुमारास ते पाणी पिण्यासाठी थोडा वेळ बसले असता अचानक त्यांच्यावर आकाशातून वीज कोसळली. वीजेचा जबरदस्त…

स्व. दाजीसाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त 115 आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
धुळे | प्रतिनिधीरिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट आणि गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री स्व. दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार नगर, देवपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथील प्राचार्य डॉ. रवींद्र वाघ यांच्या…

धुळे तालुक्यातील वन हद्दीतील तलावांचे गाळकाढण्याची परवानगी द्यावी-मा.आ.कुणाल पाटील
वनमंत्री ना.गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथील वनविभागातील लघु बंधार्यासह धुळे तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या सिमेंट बंधारे, पाझर तलाव, लघु पाटबंधारे प्रकल्पात किती प्रमाणात गाळ साठला आहे तसेच साठलेला गाळ शेतकर्यांना व वनीकरणासाठी कसा वापरता येईल? याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा अशी सूचना ना.गणेश नाईक वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज…

बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी धुळ्यात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर संवेदनशीलतेने आणि कायदेशीर दृष्टिकोनातून प्रभावीपणे कारवाई व्हावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि होप फॉर द चिल्ड्रन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन धुळे पोलीस मुख्यालयात करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये बाल न्याय (J.J. Act) आणि POCSO…

पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; एबी फाउंडेशन आणि कान्हदेश वारकरी मंडळाचा सेवाभावी उपक्रम
धुळे शहरात आज ११ जुने रोजी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करणारा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एबी फाउंडेशन आणि कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हिंदू एकता चौक येथे हे आरोग्य शिबिर पार पडले. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एबी फाउंडेशन…