
“…तर कसबा पोटनिवडणूक लढवणार”; NCP च्या रुपाली पाटील-ठोंबरेंचं विधान! म्हणाल्या,
पुणे :येथे कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी या जागेवरुन पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. मुक्ता टिळक यांच्यासाठीच २०१९ साली अगदी ऐनवेळी आपलं तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कापलं होतं असंही…