नरडाणा येथील मोफत महाआरोग्य शिबीराचा सुमारे दोन हजार रुग्णांनी घेतला लाभ

कामराज भाऊसाहेब युवामंच यांचा स्तुत्य उपक्रम

दोंडाईचा । येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते कामराज निकम यांच्या मार्गर्शनाखाली कामराज भाऊसाहेब युवामंच यांच्या सहकार्याने नरडाणा येथे मोफत महाआरोग्य रोग निदान शिबीर घेण्यात आले.
सदर शिबीराचा जवळपास २ हजार रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात मुंबई,नाशिक व धुळे येथील उच्चशिक्षित डॉक्टर उपस्थित होते.शिबिरात औषध उपचार देखील मोफत करण्यात आला होता.
यावेळी अल्पदरात MRI, CT scan, सोनोग्राफी,एक्स-रे, रक्त लघवी च्या टेस्ट देखील करण्यात आल्या. ECG व ब्लड शुगर मोफत करण्यात आले.रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यास त्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.सदर शिबीर “मा.शरदचंद्र पवार साहेब मैदान” प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर, नरडाना, ता.शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरास शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.शिबिरामार्फत १०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. तसेच सिटी स्कॅन, सोनोग्राफी, MRI, xray, व इतर टेस्ट ह्या अल्प दरात करण्यात येणार आहे. १२६ रक्त व लघवी टेस्ट शिबिरामार्फत मोफत करण्यात आल्या.महाआरोग्य रोग निदान शिबिरास डॉक्टर मनीष साळुंखे, डॉक्टर निशिगंध पाटील, डॉक्टर प्रांजल पाटील, डॉक्टर रोहन गायकवाड, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर अमोल खैरनार, डॉक्टर शीतल पाटील, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर भूपेश पाटील, डॉक्टर दीप रावल, डॉक्टर ज्ञानदीप पाटील, उपस्थित होते.
सदर शिबिरास जिल्हा परिषदेचे माजी गटनेते कामराज निकम, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुसुमताई कामराज निकम, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे, पंचायत समिती सदस्य दुल्लभ नाना, पंचायत समिती सदस्य अरुण नाना पाटील, शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे, पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रराव साळुंखे, शिंदखेडा नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख,भडणे सरपंच गिरीश देसले, सरपंच वारूळ शोभाबाई बोरसे, भरत राजपूत, देवानंद बोरसे, किशोर पाटील, नंदू भाऊसाहेब कर्ले, कामिनी नितीन चौधरी, गोराणे सरपंच योगेश पाटील,आबा कोळी पंचायत समिती सदस्य बेटावद, नरडाणा सरपंच जितेंद्र सिसोदे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन चौधरी, अजय पाटील पिंप्राड, संजय शिसोदे,पंकज शिसोदे, बच्छाव सर होळ, आदी उपस्थित होते.

दोंडाईचा प्रतिनिधी
समाधान ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares