संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेले गुणरत्ने सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सातारा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुंबई पोलीसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती.
• त्यानंतर साताऱ्याच्या गुह्यात त्यांना वर्ग करून सातारा पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी पक्षाने सदावर्ते यांच्या आवाजाचा नमुना घ्यायचा व इतर तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली होती.
त्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.