12 डिंसेबरच्या अभूतपूर्व आंदोलनातील आंदोलकांचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मानले आभार
मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान मोदी, स्व. राम जेठमलानी यांच्या प्रदीर्घ संघर्षातून 100 वर्षाचे स्वप्न साकार
धुळे मालेगाव जिल्हयाचे भाग्य बदलण्याची शक्ती असलेल्या 18,036 हजार कोटी रूपयांच्या रेल्वेमार्गास आज केर्दीय मंत्री मंडळाने एक मुखी मान्यता दिली. तब्बल 45 वर्षापूर्वी स्वर्गीय शरद जोशींच्या अध्यक्षते खाली गरूड हायस्कूल मैदाना समोर मनमाड – मालेगाव धुळे, शिरपूर, सेंधवा, धामणोद, महू, इंदोर रेल्वे मार्गची मागणी केली होती. पंचेचाळीस वर्षात असे एक ही रेल्वे मंत्री सोडले नाही की; ज्यांच्या कडे मनमाड – धुळे इंदोर रेल्वे मार्गाची मागणी केली होती. पंचेचाळीस वर्षात असे एक ही रेल्वेमंत्री सोडवे नाही की ज्यांच्या कडे मनमाड धुळे-इंदोर रेल्वे मार्गासाठी मी त्यांचे उंभरठे झिजवले नाहीत. आज साऱ्यांचे स्वप्न साकार झाले असून आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे.
या निमित्ताने प्रसिद्दीस दिलेल्या पत्रकात गोटे यांनी म्हटले आहे कि, सलग चार वर्षे तुरंगात डांबवले ठेवल्यानंतर 5 जुलै 2007 रोजी धुळयात परत आल्यावर स्वागताच्या माइया पहिल्या भाषणात खंडेराव बाजारात सांगितले होते की, या नंतर माझे पहिले काम मनमाड -इंदोर रेल्वे मार्ग ! 12 डिसेंबर 2007 रोजी मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गावर जवळ – जवळ दहा लाख अबालवृध्द आंदोलक रस्त्यावर आले होते.
मनमाड- इंदोर रेल्वे मार्गाच्या प्रश्नाकडे दिल्ली श्वरांचे लक्ष वेधल्या गेले. पहाता पहाता हा रेल्वे मार्ग सर्वच पक्षांच्या अजेंड्यावर आला. अखेरीस सर्व संकटांवर अडथाळण्यांनवर मात करून अखेर गेल्या 100 वर्षा पासूनचा एक प्रश्न मार्गी लागला. आता धुळे जिल्हयाच्या विकासाचे दरवाजे सताड उघडले गेले. आता दिल्ली मुंबई, इंडस्ट्रीयल कॉरीडोर होणे कुणीही थांबवू शकत नाही 12 डिंसेबरच्या आंदोलनातील केसेस आमच्यावर आजही सुरू आहेत. शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजीच रेल्वे आंदोलनाची सुनावणी झाली होती. सर्व लक्षावधी बांधवानां माता भगिनीनां कोटी कोटी वेळा चरण स्पर्श करून आभार मानतो. आजपर्यंत रेल्वे मार्गासाठी स्वर्गीय राम जेठमलानी, नितीश कुमार, स्वर्गीय जॉर्ज फर्नांडीस, श्रीमती. ममता बॅनर्जी, लालू प्रसाद, सुरेश प्रभू इत्यादी नेत्यांनी बहुमोल मदत केली.
प्रामुख्याने नितीन गडकरी यांनी हृदयापासून मदत केली. तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण मला घेवून चर्चा केली. नितीनजींनी मला सांगितले होते. ‘अनिल हा रेल्वे मार्ग मीच करेन आज त्यांची त्यांचा शब्द पुर्ण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्री मंडळीने सदर रेल्वे मार्गास मंजूरी देवून आपला शब्द पाळल्याबध्दल त्यांचे व मंत्री मंडळातील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद !
मनमाड – मालेगाव – धुळे रेल्वे मार्गाचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने काही राजकीय विरोधकांनी मनमाड इंदोर रेल्वे मार्ग चेष्ठाचा विषय केला होता. खरेतर, लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असतांना हा रेल्वेमार्ग 11 टक्के फायद्याचा असल्याचा अहवाल आला होता. वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे मार्गाच्या भूमीपूजनासाठी लालूजी यवतमाळला येणार होते. पण त्याच वेळी तात्कालीन आमदार कदमबांडे हे शरदपवारांना घेवून लालूजींकडे गेले व ठरलेला कार्यक्रम रद्द झाला. तद्नंतर निस्क्रीय खासदार लाभल्याने फायद्यातील रेल्वे मार्ग तोटयात घालण्याचे बहुमोल पुन्यकार्य मात्र त्यांनी केले. तद्नंतर कुणालाही काही कळू न देता. मी गुपचूप काम सुरू केले.रेल्वेमार्गास मान्यता मिळेपर्यंतच नव्हे तर, तद्नंतरही त्यांना कुणालाही वारे लागू दिले नाही. त्याचा आज दृश्य परिणाम व आनंद आपण घेत आहोत. माइया जीवनातील हा सुवर्ण दिवस आहे. तो केवळ आणि केवळ माननीय नितीनजी गडकरी साहेब व लक्षवधी आंदोलनामुळेच माझ्या आयुष्यात उगवला , असेही अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.