दोंडाईचा- जुने कोळदे ता. शिंदखेडा येथे काटेरी झाडाझुडुपांच्या अडोक्यात विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूवर कारवाई करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी हातभट्टीची उग्र वासाची कच्ची दारू पन्नास रुपये लिटर प्रमाणे एकूण पाच ड्रम प्रत्येकी ड्रम मध्ये 20 लिटर कच्ची हातभट्टीची दारूचा मुद्देमाल कारवाई करत नष्ट करण्यात आला आहे. आकाश सुरतसिंग भिल रा. जुने कोळदे ता. शिंदखेडा हा विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यात एकूण 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक नकुल कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, यासह आदींनी ही कारवाई केली आहे..
समाधान ठाकरे पत्रकार दोंडाईचा