साक्रीत मुलानेच बापाच्या दगड घालून केला खून

साक्री – मुलानेच बापाचा खून करून मुडदा पाडल्याची घटना धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील खरगांव येथे घडली. या घटनेने साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर मुलगा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध कसून घेत आहेत.

बापू पांड्या कुवर (५३) रा. खरगाव वारसा हे शेतीकाम करतात. ते गावात पत्नी फुलाबाई कुवर व मुलगा विजय बापू कुवर (२५) यांच्यासह राहतात. बापू कुवर हे घरात जेवण करत असताना विजय कुवरने त्यांच्याशी वाद घातला वडीलांसोबतचा वाद विकोपाला गेल्याने मुलगा विजय याने संतापाच्या भरात वडील बापू कुवर यांच्या डोक्यात दगड टाकून खून केला. खून केल्यानंतर विजयने घटनास्थळावरुन पळ काढला.

घटनेची माहिती मिळाताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी घटनास्थळाची पहाणी करून बापू कुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळनेर रुग्णालयात पाठवला. दरम्यान, मुलगा विजय कुवर हा चिडखोर स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. एकुलल्या एक मुलाने बापाचा खून केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares