गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहरात पोलिसांनी रूट मार्च केले. शहरातील मानाच्या गणपती विसर्जन मार्गावर तसेच संवेदनशील भागात रूट मार्च करण्यात आला होता. रुट मार्च हा पोलीस ठाणे पासून सुरू होऊन गोविंद नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, अभिषेक चित्रमंदिर, भोई वाडा, आझाद चौक, सोनार गल्ली मार्गे एकता चौक करून पोलीस ठाणे येथे समाप्त झाला. गणेशोत्सव काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी या रूट मार्चचे आयोजन दोंडाईचा पोलीसांनी केले.

याप्रसंगी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे,दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत पाटील, हनुमंत गायकवाड, डिगबंर शिंपी, उपनिरीक्षक हेमंत राऊत, चांगदेव हंडाळ, नकुल कुमावत, पोसई रविंद्र पाटील, प्रशिक्षणार्थी पोसई शिवप्रसाद आवळकर, मयूर माने, सोहम देशमुख, असई हारूण शेख, तुषार मोरे, राजेश बागुल, बाजीराव बोडखे,संजी गुप्ता उपस्थित होते.
तसेच दोंडाईचा गुप्तचर विभागाचे अविनाश पाटील, संदेश बैसाणे, होमगार्ड प्रमुख अनिल ईशी यांच्यासोबतच पंचेचाळीस पोलीस कॉन्स्टेबल व एकशे आठ होमगार्ड सहभागी झाले होते.
प्रतिनिधी समाधान ठाकरे,दोंडाईचा