धुळ्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने दिले निवेदन
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने २५ऑगस्ट रोजी होणारी पूर्वपरीक्षा रद्द केली. मात्र पुढची परीक्षा केव्हा होईल या बाबत अद्याप कोणतेही संकेत दिसत नाहीत. परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होते आहे. हि परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी घेण्यात यावी,अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने केली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आली.
परीक्षा रद्द करण्याला पंधरा दिवस उलटल्यानंतरही (एमपीएससी) ची तारीख जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. २५ ऑगस्टला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थीनी पुणे येथे ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे २२ ऑगस्ट ला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. एमपीएससीने चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडले आहे. परीक्षा अशा लांबवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. तसेच वाढत्या वयाबरोबर उपजीविकेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतात. अजून घरच्यांचे सुद्धा मानसिक दबाव या विद्यार्थ्यांवर निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागते. वाढती बेरोजगारी खूप दिवसापासून न होणाऱ्या परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय. वाढत्या वयामुळे लग्नही मुलांचे वेळेवर होत नाही. सर्वच नियोजन कोलमडले जाते तरी आपण या विषयी गांभीर्यपूर्वक विचार करुन आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि लवकरात लवकर या विद्यार्थ्यांचा परीक्षा घेऊन त्यांना न्याय द्यावा. येणाऱ्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका आहेत आता आचारसंहिता सुद्धा लागेल. त्या आचारसंहितेच्या अगोदर जर विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यात तर त्यामुळे विद्यार्थी हे वया मध्ये बाद होणार नाही. विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली
यावेळी युवासेना विस्तारक तथा उप जिल्हा युवाधिकारी कुणाल कानकाटे, महानगर युवाधिकारी मनोज जाधव, सिद्धार्थ करनकाळ, तालुका युवाधिकारी गणेश चौधरी, आदी युवासैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे,धुळे