ल्याण-डोंबिवली परिसरात तृतीयपंथी चोरांची टोळीच सक्रिय झाली आहे. गणेश उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरून बाप्पाच्या मूर्तीसमोर नाचत चक्क घराटाळ्या दागिन्यांवरच ते डल्ला मारत आहेत. विशेष म्हणजे दागिने पळवल्यावर ते घरच्यांकडून पैशांची मागणी देखील करत आहेत.
कल्याणच्या वाडेघर परिसरात अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र पाटील यांच्या घरात ४ ते ५ तृतीयपंथीयांनी शिरत गणपतीच्या बाजूला ठेवलेल्या १५ तोळ्याचे सुमारे २,४०,००० रुपये किमतीचे २ गंठण असलेल्या दागिन्यांच्या पिशवीवर हात साफ केला. इतकेच नव्हे, या तृतीयपंथींनी घरच्यांकडून 2000 रुपयांची मागणी केली आणि अखेर 200 रुपये घेऊन सर्वांसमोरच पळ काढला.चोरी झाल्याचे घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या खडकपाडा पोलीस या पाचही तृतीयपंथी व्यक्तींचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घेत आहेत.