धुळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण जखमी

धुळे तालुक्यातील चितोड येथे गणपती मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, गणपती मिरवणुकी दरम्यान ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. परी शांताराम बागुल (वय 13), शेरा बापू सोनवणे (वय 6) आणि लड्डू पावरा (वय 3) अशी अपघातात मयत झालेल्या बालकांची नावे आहे.या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांना तातकाळ धुळ्यातील सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये गायत्री निकम पवार (वय 25), विद्या भगवान जाधव (वय 27), अजय रमेश सोमवंशी (वय 23), उज्वला चंदू मालचे (वय 23), ललिता पिंटू मोरे (वय 16) आणि रिया दुर्गेश सोनवणे (वय 17) यांचा समावेश आहे. त्यापैकी एकाची स्थिती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून पोलिसांनी घटनास्थळी धावून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रतिनिधि कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top