वयोवृद्ध आजोबांनी हरवलेला मोबाईल मालकाला केला परत,प्रामाणिकपणाचे असे ही उदाहरण..

आपल्याला मिळालेला मोबाईल पोलिसात जमा करून त्याच्या मूळ मालकाला परत करणाऱ्या आजोबांचे सर्व स्तरातून सध्या कौतुक होतेय.. झाले असे कि ,
दोंडाईचा येथील पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे ऋषिकेश छोटूलाल सांगळे रा.गोपालपुरा दोंडाईचा ता. शिंदखेडा यांच्या मालकीचा रेडमी कंपनीचा मोबाईल दि. २४ सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान शहरात हरवला होता. हा मोबाईल सुभाष दगडू भावसार यांना शहरातील मंडळ चौफुली येथे मोबाईल मिळून आला. भावसार यांनी तो मोबाईल घेऊन लागलीच दोंडाईचा पोलीस ठाणे गाठले.
यावेळी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी यांनी लागलीच मोबाईल मालकाचा शोध घेऊन मुळ मालकाला शोधून सुभाष भावसार यांच्या हस्ते ऋषिकेश सांगळे यांना मोबाईल परत देण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी रामभाऊ माणिक उपस्थित होते. आज देखील माणुसकी शिल्लक असल्याचे मूर्तीमंत उदाहरण भावसार यांच्या माध्यमातून दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares