एमआयडीसीत सुरु होता कारखाना, एलबीसीची मोठी कारवाई, अधीक्षक धिवरेंनी दिली भेट
धुळे येथील अवधान शिवारात असलेलया एमआयडीसीमध्ये धाड घालून खाद्य पदार्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या लाल मसाल्यात मोठ्या प्रमाणात भेसळ करणारे रॅकेट
पोलिसांनी उघड केले आहे. यासंदर्भात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एमआयडीसीमधील कंपनीच्या एका भाड्याच्या गाळ्यात हा गोरख धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे आणि मुक्तार अन्सारी यांचा टावर मसाले ब्रॅण्ड नावाने व्यवसाय आहे. त्यांच्याच गाळ्यात लाल मसालयात भेसळ करण्याचे हे काम सुरू होते. इम्रान अहमद रा. मुस्लिम नगर धुळे आणि मोहोम्मद असीम रा धुळे हे दोघेही हानिकारक रंग आणि केमिक्ल्स मस्जिद बंदर येथून आणायचे आणि मुख्तार अन्सारी याच्या एमआयडीसी
मधील भाड्याच्या गाळ्यात लाल मसाल्यात भेसळ करण्याचे काम करीत असत. पोलिसांनी आज या ठिकाणी
धाड टाकली असता 120 किलो लाल मसाला. त्यात 8 किलो भेसळयुक्त तेल आणि 40 किलो अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग आणि बाकीचे केमिकल्स आढळून आले. लाल मसालयात केमीकल मिसळून 110 रुपये प्रती किलोने विकला जातो. मात्र टावर ब्रँड च्या मसाल्याची किंमत 750 आणि 400 रुपये इतकी आहे. कायद्याच्या तरतुदी प्रमाणे फूड एंड ड्रग्ज कार्यालतील अधिकारी यांनाही बोलवण्यात आले. त्यांच्या मार्फत सगळा माल केमिकल एनालिसिस साठी पाठवला जाईल आणि रिपोर्ट आल्यानंतर त्या प्रमाणे पुढील कायदेशीर कारवाही होईल,
असे पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
अधिक्षक धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी मोहाडी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. स्वयंपाक बनवितांना भाजीला चव यावी म्हणून उत्कृष्ट व दर्जेदार मसाले वापरले
जातात, मात्र धुळ्यात चक्क मसाल्यांमध्ये घातक अत्यंत हानिकारक पदार्थ वापरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा गंभीर प्रकार पोलिसांच्या सर्तकतेमुळे उघड झाला आहे.