खान्देशचे नेते,माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील यांचे वृद्धपकाळाने आज दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर उद्या दि २८ रोजी त्यांच्या संस्थेतील एस एस व्ही पी एस कॉलेज ग्राउंड वर अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
