धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात आज ३० रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एकलव्य बिल जनसेवा मंडळ तसेच या आदिवासी समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात समविष्ट न करण्याबाबत शहरातील नंदुरबार चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने अप्पर तहसीलदार यांना या आशयाचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, धनगर व धनगड या शब्दांमुळे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आदिवासी व धनगर समाजात आरक्षणावरून मोर्चा आंदोलन तसेच इतर अनेक गोष्टी घडत आहे. याच प्रश्नावर ड्रायबल रिसर्च सेंट्रल पुणे यांनी समिती गठन करून धनगर समाजाच्या चालीरीती व त्यांच्या संस्कृती सर्वोच्च न्यायालयाने धनगर व धनगड मधील फरक स्पष्ट करून धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण देता येणार नाही असे निर्णय काढले होते तरी या तीन तोंडी सरकारने काही दिवसा अगोदर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण करू असे खोटे आश्वासन दिले आहे. तसेच आदिवासी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही राज्यातील सरकार करीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसा अगोदर पत्रकार परिषद मार्फत धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करून असा जीआर काढणार आहेत असे आश्वासन दिले होते तरी या गोष्टीचा आम्ही आदिवासी समाजामार्फत जाहीर निषेध करण्यात आला. धनगर समाजाला आदिवासी अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये सरकारने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा तरी शासनाने या गोष्टीची दखल न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यास विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. साडेअकरा वाजता सुरू झालेले हे रास्ता रोको आंदोलन अर्धा तास पर्यंत सुरू होते. चहूबाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अप्पर तहसीलदार संभाजी पाटील व पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून रास्तारोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी आंदोलन करताना देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात येऊन अप्पर तहसीलदार संभाजी पाटील व पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले..
यावेळी राज्याचे एकलव्य भील जनसेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष युवराज गुलाबसिंग सोनवणे, प्रदेशाध्यक्ष रवी जाधव, जिल्हाध्यक्ष अंकुश नाईक, तालुका अध्यक्ष देविदास शेवाळे, तालुका संपर्कप्रमुख कैलास मालचे, विक्रम अहिरे, तसेच संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते विक्की सोनवणे, निलेश वाघ, उमेश वाघ, रोहित सोनवणे, बंटी जाधव, आनंद मोरे, जेष्ठ कार्यकर्ते लहू मालचे, अंकुश मालचे, दिनेश मोरे, प्रवीण वसावे, मोहन सोनवणे, सोमा सोनवणे, अजय भिल, विशाल पवार, तालुका मीडिया प्रमुख सुनील पवार, विशाल मालचे, सामाजिक कार्यकर्ते छोटू सोनवणे, सदाशिव मिस्तरी तसेच गाव खेड्यावरील मांडळ गावाचे राजूभाऊ मालचे, राकेश शिरसाठ, गोपाल भील, जुने कोडदे येथील शाखाप्रमुख मनीष मालचे, किसन मालचे, अरुण सोनवणे, जगदीश सोनवणे इतर प्रमुख कार्यकर्ते व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच आदिवासी टायगर सेना चे तालुकाध्यक्ष कृष्णा मालचे, शहराध्यक्ष आदी मोठ्या संख्येने समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
प्रतिनिधी समाधान ठाकरे,दोंडाईचा