गुन्हेगारी सोडून चांगले कामाला सुरवात करा, निजमपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्रमात सपोनि भामरे यांचे आवाहन

निजामपूर – दिनांक २ ऑक्टोंबर रोजी महापुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी प्रन्तप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निजामपूर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास निजामपूर – जैताने येथील पत्रकार बांधवांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी गावातील व परिसरातील नागरिक निजामपूर पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

सुरवातील निजामपूर पोलीस स्टेशनचे सपोनि मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनच्या आवारात व मुद्देमाल विभागात साफसफाई व स्वच्छता करण्यात आली यावेळी कार्यक्रम प्रसंगी सपोनी मयूर भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गुन्हेगारीने कमऊन आणलेला अवैध पैसा हा क्षणिक सुख देतो व कष्टाने कमावलेला पैसा हा सुख-समृद्धी घेऊन येतो म्हणून तरुणांनी गुन्हेगारीला बळी पडू नये व आपले आयुष्य पोलीस स्टेशन,कोर्टात घालूवू नये असे देखील ताकीद करण्यात आले व पुढे ते म्हणाले कि महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात हिंसा सोडून अहिंसाचा मार्ग वर चालून सत्याग्रह करून ब्रिटिशांच्या राज्य तत्वावर सत्य व अहिंसा या मार्गाने देशात आपली आपली क्रांती घडवून आणली.
कार्यक्रमा चे विशेष सूत्र संचलन जेष्ठ पत्रकार रघुवीर खारकर यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला पत्रकार परवेज सय्यद,अकबर पिंजारी,हेमंत महाले आदी पत्रकार बांधवही उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहा उपनिरीक्षक सोनवणे, पोसइ भामरे , हेको.माळचे,हेको मोरे, पोको चव्हाण, पोको सुनील अहिरे, पोको दीपक महाले, पोको राकेश महाले, पोको दुरगुडे ,पोको नागेश, पोको पावरा, पोको व पोलीस मित्र अनिस पठाण व त्यांचे सहकारी मित्र साहिल, जुनेद तांबोळी, इसाक मिर्जा, गोकुळ ईशी, अजय डबरू यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares