मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांना भोंगा व पदाधिकाऱ्यांसह अटक करण्यात आली.राज ठाकरे यांच्या आदेशान्वये व संभाजीनगर येथील सभेत जाहिर केल्याप्रमाणे दिनांक 4 मे रोजी मशिदी समोर दुप्पट आवाजाने भोंगा लावून हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख व त्यांचे सहकारी आज रोजी सकाळी शिवतीर्थ येथे जमले असताना त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करत शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे. यावेळी मनसे जिल्हा सरचिटणीस संदीप जडी मनसे धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्त्री मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष संध्या पाटील , उपजिल्हाध्यक्ष स्वाती जाधव, शहर उपाध्यक्ष प्रशांत तनेजा , राजेश दुसाने, विभाग अध्यक्ष योगेश वाणी, हरीश जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी अटक केली यावेळी त्यांच्या सोबत हनुमान चालीसा वाजवण्यासाठी सोबत घेतलेला भोंगा देखील जप्त करण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी जय श्रीराम, जय हनुमान अशा जोरदार घोषणा दिल्या व आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत सदर अटक ही हिंदूंचा आवाज दाबला जावा यासाठी असली तरी आम्ही हे सहन करणार नाही. अशा घोषणा देण्यात येत होत्या.
Related Posts
धुळ्यात मा.नगरसेवक संजय पाटील ठरू शकतात उमेदवारीचे दावेदार
कारभारावर टीका करीत भाजपाला ठोकला रामराम धुळे शहर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढते आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून…
खळबळजनक : शिरपूर तालुक्यात आढळला कुजलेला मृतदेह
शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील मक्याच्या शेतात एकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे ओढणीच्या साहाय्याने पाठीमागे दोन्ही हात बांधून त्याच…
मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार जखमी
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर ओव्हरटेक च्या नादात एस.टी.बसने समोरील ट्रकला धडक दिल्याची घटना घडली असून यात चार…