आगीत उध्वस्त झालेल्या घरातून लाखोंच्या सामानाची चोरी

चेंबूरमधील एका घराला दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगेमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला . या शोकातून सावरायच्या आधीच आगीत नष्ट झालेल्या घरातून लाखोंचे सोने आणि इतर ऐवज चोरीस गेल्याची घुणास्पद घटना समोर आली आहे

चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये एका घराला दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली असता या आगीमध्ये गुप्ता कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ माजली होती . मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. गुप्ता कुटुंबीय गेल्या ५० ते ६० वर्षांपासून सिद्धार्थ कॉलनी परिसरात राहत होते . अशी धक्कादायक , दुखत घटना कोणाबरोबरही घडू नये अशीच भावना लोक व्यक्त करत होते . त्यात माणुसकी अजूनही जिवंत आहे का? असा प्रश्न पडावा अशी भयानक घटना उघडकीस आली
ज्या घरात हे अग्निकांड झालं व सात कुटुंबीय मृत्युमुखी पडले त्याच घरात चोरी झाल्याने सगळीकडे गोंधळ उडाला आहे . गुप्ता कुटुंबाच्या घराला भीषण आग लागली होती , ती विझवल्यावर घराच्या आस पास काही अनोळखी व्यक्ती घुटमळत होते .त्यांच्यापैकी काही जणांनी गुप्ता यांच्या घरात प्रवेश केला आणि त्या घरातील कपाट तोडून, त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 12-14 लाखांचा ऐवज लंपास केला . ज्या घरात एका दुर्घटनेमध्ये ७ लोकांचा जीव गेला तेथेच हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य घडले .
आगीच्या घटनेनंतर मृतांना तातडीने राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी त्यांच्या मृत्यूचा दाखला तयार करण्यासाठी आधारकार्डची गरज होती. यावेळी गुप्ता याची मुलगी वंदना हिने तिच्या मुलीला दुर्घटनाग्रस्त घरातील कपाटामधील आधारकार्ड घेण्यासाठी पाठवले होते. यावेळी घरातील कपाटातील तिजोरी तोडल्याचे तिच्या लक्षात आले.तिने लागलीच ही गोष्ट वंदना हिला सांगितली आणि त्या लगेच घटनास्थळी आल्या . तिजोरीतील दागिने आणि रोख रक्कम लंपास झाले आहेत हे त्यांच्या लक्षात आले . लागलीच त्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली . पोलिसांची कार्यवाही चालू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares