धुळे – शहरातील नगावबारीनजीक अजमेरा महाविद्यालयाजवळ आज रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात बस वाहकासह तीन जण जागीच ठार झाले. तर बस चालकासह पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत. सर्वांना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भयंकर होता की बसचा काच फुटून बस वाहक थेट बाहेर फेकला जावून बस खाली आला.नरेंद्र अरुण पाटील (कमखेडा ता शिंदखेडा आगार )असे मयत वाहकाचे नाव आहे. चालक गंभीर जखमी असून 407 वाहनावरील पावरा व सूडके नामक दोन जण ठार झाले आहेत. एमएच 20 बी एल 2126 क्रमांकाची धुळे-शिंदखेडा ही बस शिंदखेडाच्या दिशेने जात होती. पावणे नऊ वाजेच्या सुमारास नगावबारीच्या पुढे अजमेरा महाविद्यालयाजवळ एमएच 18 एए 9925 क्रमांकाच्या बंद पडलेल्या 407 वाहनाला एमएच 19 एस 1249 क्रमांकाचे 407 वाहन टोचन लावून घेऊन जात होते. या 407 वाहनावर भरधाव बस धडकली. धडक इतकी भीषण होती की बसचा वाहक थेट काच फुटून बाहेर फेकला जाऊन बस खाली आल्याने ठार झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. काही प्रवासी देखील जखमी झाल्याची सांगितले जात आहे. तसेच 407 वाहनावरील दोन जण ठार झाले. अपघात झाल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी व परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच अपघाताची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर बसखाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. मयत व जखमींना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.
Related Posts
पांझरा नदीच्या पात्रात सोडलेले पाणी
अक्कलपाडा प्रकल्पातून विसर्ग धुळे प्रतिनिधी: धुळे आणि साक्री तालुक्यांच्या सीमा रेषेवर असलेल्या अक्कलपाडा निम्मं पांझरा प्रकल्पाच्या क्षेत्रात 2, 3 दिवसापासून…
धुळे खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर,आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात सर्व जागा जिंकल्या
धुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले.…
धुळ्यात तुरूंगाधिकाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न, तर दुसऱ्या घटनेत दुचाकी लंपास
धुळे शहरातील नकाणे रोड परिसरात अज्ञात व्यक्तींनी एका तुरूंगाधिकाऱ्याच्या घरात चोरीचा प्रयत्न केला तर दुसऱ्या ठिकाणी दुचाकी चोरून नेल्याची घटना…