धुळे – विभावरी शिरूरकर ,प्रा आनंद यादव पासून ते प्रिमेटिव कम्यूनिझम ची फिलॉसॉफी निर्मीणाऱ्या कॉम्रेड शरद पाटील, अँड.राहुल वाघ पर्यंत स्त्री जीवनाचा वेध हा नेणीवीचा आविष्कार आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामी कडे नेणाऱ्या संहिता झुगारल्या शिवाय तिचे अस्तित्व निर्माण होवूच शकत नाही, असे प्रतिपादन प्रा डॉ पंडित घनश्याम थोरात यांनी केले. सावली ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या विशेष प्रबोधन ज्ञान सत्रात प्रमुख वक्ते म्हणून “मानस अंतरंग आणि स्री जीवन” या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
‘थेरी गाथेतले साहित्य सौंदर्य दुर्लक्षित राहिले असून विदुषी इरावती कर्वे,रुपाताई कुलकर्णी, इदिराताई आठवले यांच्या समग्र जीवन अंतरंग समजून घेण्याची गरज आहे. नित्य वाचन चिंतन, बौद्धिके, निसर्गप्रेम, नियमित व्यायाम असेल तर स्मरणशक्ती ला वार्धक्य कधीच येत नाही, असेही प्रा. डॉ. थोरात यांनी आवार्जुन सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, विदुषी जयश्रीताई शहा होत्या. याप्रसंगी ९८ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर , विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे ही अभिनंदन करण्यात आले. विशेष म्हणजे जळगाव लोकमत चे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांच्या ६ ऑक्टोबर च्या स्त्री जीवनावर विचार प्रवर्तक लेख लिहिल्या बद्दल त्यांचे उपस्थित महिलावर्गाकडून टाळ्यांच्या गजरात विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर मानसतज्ज्ञ डॉ घनश्याम यांनी उपस्थितांच्या प्रश्नोत्तराना मुद्देसूद उत्तरे दिलीत. पद्मश्री पुरस्कारासाठी धुळ्यातून नॉमिनी असलेल्या प्रा.डॉ घनश्याम याना प्रारंभी उपस्थित ज्येष्ठ महिलांनी स्टँडिंग अभिवादन दिले. प्रस्ताविक विमल पवार यांनी तर सूत्रसंचालन उल्का वाणी यांनी ईशस्थवन चंपावती अग्रवाल यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.