चोरट्याकडून १८ मोबाईल व मोटारसायकल जप्त , रोकडोबा जवळची घटना

धुळे लळींग येथील रहिवासी अजय सखाराम गवळी हे रोकडोबा येथे दर्शनासाठी गेले असता त्यांचा मोबाइल लाम्बवण्याची घटना घडली या घटनेचा तपास करताना तालुका पोलिसांनी मालेगाव येथील २ संशयितांपासून तब्बल १८ मोबाईल , १ मोटारसायकल असे १ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल चोरीची घटना हि ८ सप्टेंबर २०२४ रोजी रोकडे हनुमान मंदिर येथे घडली . फिर्यादी अजय सखाराम गवळी हे लळींग येथून रात्री ०९:३० च्या सुमारास रोकडे हनुमान मंदिर येथे दर्शनास गेले होते. तेथे अजय गवळी फोनवर बोलत असताना दोन चोरटे मोटारसायकलेहून आले . चोरट्यांनी अजय ह्यांच्या हातातून जबरदस्तीने फोन हिसकावला आणि पसार झाले .
हा गुन्हा ९ ऑक्टोबर २०२४ रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला . लगेचच धुळे तालुका पोलीस निरीक्षक श्री अभिषेक पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , उपनिरीक्षक किशोर काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने आरोपींच्या शोधासाठी आर्वी शिवार पिंजून काढला . तसेच मालेगावातही तपास केला . तपासादरम्यान पथकाने मालेगावातील नूर मोहोम्मत इस्तेयात अहमद (२२) आणि मोहोम्मद मुदतसीर खालीकूदजमा (२१) या संशयितांना ताब्यात घेतले . दोघंही संशियितांकडून गुन्ह्यात वापरली गेलेली १ मोटारसायकल , १८ मोबाइल असे तब्बल १लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . या दोघांनी गुन्ह्याची कबुलीही दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ह्या आरोपींवर अगोदरही गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालावरून त्यांनी इतर ठिकाणी केलेल्या गुन्ह्याबाबत तपास सुरु आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील हे करत आहे.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे , धुळे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares