बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली. न्यायदेवतेच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून टाकण्यात आली आहे आणि तिच्या एका हातातील तलवार काढून राज्यघटना देण्यात आली आहे. जेणेकरून देशात कायदा आंधळा नाही, असा संदेश जाईल. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयात हा पुतळा बसवण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या वाचनालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली. अगोदर डोळ्यावर पट्टी असलेली न्यायदेवता हि ब्रिटिश वसाहतवादाची ओळख आहे. तिच्या डोळ्यावर पट्टी असते तर एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात तराजू असतो. असे म्हणतात कि न्यायदेवता निष्पक्षपणे न्याय करते , तिच्यासाठी सर्व सामान आहेत म्हणून तिच्या डोळ्यावर पट्टी आणि हातात तराजू असतो. पण पुराव्यांअभावी कधी पीडितांना न्याय मिळाला नाही तर ‘न्यायदेवता आंधळी आहे’ असे उपहासाने म्हंटले जाते. मात्र नव्या भारतीय न्यायदेवतेचे डोळे उघडे असून आता हातात राज्यघटना आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालय आणि न्यायव्यवस्था पारदर्शकतेच्या दिशेने पावले टाकत आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालीच व्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आली आहे. न्यायदेवता कधीही आंधळी असू शकत नाही, तिच्या दृष्टीने सर्व समान आहेत. तसेच तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, न्यायालय हिंसेचे समर्थन करत नाही तर घटनात्मक कायद्यांनुसार नायदान करते. त्यामुळे न्यायदेवतेच्या हातात राज्यघटना असणे अधिक योग्य आहे, असे सरन्यायाधीशांचे म्हणणे आहे.
याशिवाय आणखी एक मोठा बदल घडला आहे. टिळक मार्गावर सुप्रीम कोर्टाच्या समोर एक मोठी जस्टिस क्लॉक बसवण्यात आली आहे. या व्हिडीओ वॉलमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीचे घड्याळ सतत चालू असते. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणे जाणून घेता येतात. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचा दैनंदिन लेखाजोखा प्रत्येक क्षणी जनतेसमोर मांडला जातो. तसे वेबसाईटवरहि जस्टिस क्लॉक पाहता येत असले, तरी सर्वसामान्यांना थेट माहिती मिळावी आणि यंत्रणेत पारदर्शकता यावी यासाठी जस्टिस क्लॉकची व्हिडिओ वॉल बसवण्यात आली आहे.