जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने तिराणा (अल्बेनिया) युरोप येथे दिनांक 20 ते 27 ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी प्रा.दिनेश गुंड यांची तांत्रिक अधिकारी (पंच ) म्हणून निवड करण्यात आली. हि निवड भारतीय कुस्ती संघाच्या वतीने करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक अधिकारी म्हणून निवड होण्याची ही त्यांची ६२ वी वेळ आहे.जागतिक कुस्ती संघ टनेचे प्रा.दिनेश गुंड हे प्रथम श्रेणीचे पंच आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली 20 वर्ष आपल्या कामगिरीचा विक्रम नोंदविला आहे. सन 2003 पासून आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा प्रमुख, निवड समिती प्रमुख, पंचाना प्रशिक्षण देणे या कामामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.
प्राध्यापक दिनेश गुंड यांचे धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष राजवर्धनजी कदमबांडे, सचिव सुनील चौधरी, प्रमुख आश्रयदाते संजय शेठ अग्रवाल, उपाध्यक्ष सुनील महाले, दिलीप लोहार, चंद्रकांत सैंदाणे, रावसाहेब गिरासे, शामकांत इशी, सहसचिव उमेश चौधरी, संघटक महेश बोरसे, संदीप पाटोळे, नितीन नगरकर, मदन केशे यांनी अभिनंदन केले आहे.