दोंडाईचा – शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाणे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या ५ दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून पोलिसांनी हि कारवाई केली.
दोंडाईचा शहरातील मेहेतर कॉलनी भागात सुशीला अशोक नेतले हि महिला हातभट्टीची दारूविक्री चा व्यवसाय करत होती. तसेच गोपाळपुरामधील दारूविक्री करणारा महेंद्र शिवराम पवार, निमगूळ गावातील रेखाबाई नानाभाऊ भील, कुरुकवाडे गावातील रवींद्र मंगलसिंग भिल यांच्यावर हातभट्टीची दारूविक्री करण्याबद्दल कारवाई करण्यात आली. तसेच विनोद सचिन मोरे आणि राजू विशाल बोरसे हे हतनूर येथील रहिवासी विदेशी दारूची चोरटी वाहतूक करत होते. दारूसह त्यांची मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे दोंडाईच्या शहरातील स्टेशनरोड भागात टपरीच्या आडोशाला सट्टा चालवणारा भटू शिवराम पवार आणि शहरातील गुरव स्टॉप नजीकच्या नाल्यात सट्टा चालवणारा रतिलाल झुलाल ठाकूर यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
दोंडाईचा पोलिसांनी ५ दिवसात ७ ठिकाणी कारवाया करून ८० हजार ४०५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी दिलेल्या सूचनेनुसार हि कारवाई करण्यात आली आहे.