बालरंगभूमी परिषद आयोजित दिव्यांग मुलांचा “यहा के हम सिकंदर” महोत्सव धुळ्यात संपन्न

बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखा नियोजित यहा के हम सिकंदर हा दिव्यांग मुलांचा विविध कलागुणांचा महोत्सव दि २२ ऑक्टोबर रोजी शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिरात जल्लोषात संपन्न झाला

या महोत्सवात जिल्ह्यातील 17 दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री देखील यावेळी करण्यात आली, विशेष मुलांच्या महोत्सवाला बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के सामंत,बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार,सह कार्याध्यक्ष दिपाली शेळके,स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी यांच्यासह बालरंगभूमी परिषदेचे धुळे जिल्हा शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी बोलताना बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के सामंत म्हणाल्या की, समाजातील सर्व घटकातील मुलांना रंगमंच उपलब्ध व्हावा तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषद या महोत्सवांचे आयोजन करीत आहे जास्तीत जास्त शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना बालरंगभूमी परिषदेत सहभागी करून घ्यावे. आयुष्य अतिशय सुंदर असून विद्यार्थ्यांनी ते आयुष्य कलागुणांचा आनंद घेत जगावे हा एकमेव उद्देश बालरंगभूमी परिषदेचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

बालरंगीभूमी परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून लहान मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना रंगमंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या बालरंगभूमी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे नुकताच बालरंगभूमी परिषदेच्या वतीने लोककला प्रशिक्षण आणि लोककला महोत्सव पार पडल्यानंतर आता दिव्यांग मुलांचा यहा के हम सिकंदर हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता

शहरातील शाहू महाराज नाट्य मंदिरात झालेल्या विशेष मुलांच्या यहा के हम सिकंदर महोत्सवात अंध मुलांची शाळा, अंध मुलींची शाळा, प्रा. र. के. वाकश्रवण विकास विद्यालय, राऊळ खानोलकर निवासी मूकबधिर विद्यालय, सन्मती विद्यालय, अस्थिव्यंग मुलांची निवासी शाळा, अंकुर विद्यालय, आनंद निवासी मूकबधिर विद्यालय, स्वप्न स्पेशल स्कूल, कै. बापूसाहेब ऐन झेड मराठे विधायक संस्था अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह शिरपूर, श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह, सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर संचलित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे, कै. बापूसाहेब एन झेड मराठी विधायक संस्था संचलित निवासी मतिमंद मुला मुलींचे विद्यालय, प्रियदर्शनी मुला मुलींचे निवासी मूकबधिर विद्यालय, श्री सातपुडा तापी परिसर संमिश्र अपंग शिक्षण समिती संचलित निवासी मूकबधिर विद्यालय,स्वामी टेउराम हायस्कूल धुळे, स्वप्न स्पेशल स्कूल आणि स्पर्श सर्व्हिस सेंटर या शाळांमधील विद्यार्थी आपले विविध कलागुण सादर केले, या महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अपंग महिला कार्यशाळा यांच्यासह महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व दिव्यांग मुला मुलींतर्फे बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यावेळी करण्यात आली.

बालरंग भूमी परिषद आयोजित विशेष मुलांच्या यहा के हम सिकंदर या महोत्सवाच्या समारोपा प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नियमक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील, बालरंगभूमी परिषदेच्या सहकार्यवाह दिपाली शेळके, बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखेचे कार्यध्यक्ष सिद्धांत मंगळे आदी मान्यवर उपस्थित होते

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे जिल्हाध्यक्ष केदार नाईक, कार्यध्यक्ष सिद्धांत मंगळे, कार्यवाह सुजय भालेराव, अभिजित कबाडे, हर्षल परदेशी, वैशाली जमादार, ज्योती चौहान, चेतन उपाध्याय, गौरव मतकर,आदींनी परिश्रम घेतले. महोत्सवाचे सूत्रसंचालन धनंजय दीक्षित यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top