राज्यात ज्या ठिकाणी पाऊस नसतो, तेथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला केला आहे.राज्यातील लांबणीवर पडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज सुनावणी झाली. यावेळी जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार ठेवा, असेही निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.राज्य सरकारने लांबणीवर टाकलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर कराव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ४ मे रोजी दिले होते.
