पुणे शहरात नाकाबंदी दरम्यान 138 कोटींचं सोनं जप्त…

पुणे शहरात जागोजागी पोलिसांची नाकाबंदी
नाकाबंदी दरम्यान 138 कोटींचं सोनं जप्त…

             पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदीत पोलिसांनी 138 कोटींचं सोने जप्त केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात हे वाहन मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
               एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले.नाकाबंदी दरम्यान सापडलेल्या सोन्याची किंमत जवळपास 138 कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. हे सोनं नेमकं आले कुठून, कुठे जात होते? कुणाचे होते याचा तपास आता पोलीस करत आहे.संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares