धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिस प्रशासन चांगलेच ऍक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा अवैध वस्तूंची तसेच पैशांची वाहतूक अवैध मार्गाने होऊ नये यासाठी जिल्हाभरात यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पोलिसांनी धुळे – सुरत मार्गावर आपला ताफा वळविला. गुजरातहून धुळ्याकडे येणाऱ्या तब्बल ३० ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली.
निवडणूक काळात प्रवासी हेतूने अवैध वस्तूंची वाहतूक केली जाते. नुकतेच शिरपूर बसस्थानकातुन एका बसमध्ये ठेवलेल्या ३ बॅग्स बेवारस असल्याचे आढळून आल्याने तपासणी केली असता त्यात कोंबून गांजा भरलेला असल्याचे निष्पन्न झाले. सरकारी बसेस सह पोलिसांनी आता आपला मोर्चा खाजगी प्रवासी वाहनांकडे वळविला आहे. याच अनुशंघाने आज पहाटे गुजराहून येणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली . यात काही गैरप्रकार आढळून येतो आहे का , याची कसून चौकशी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात येत आहे.
