बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी ड्रोनने हत्यारे मागवली

महाराष्ट्रातील विख्यात राजकारणी बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या झाली. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी, त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयातून बाहेर जात असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर ३ गोळ्या झाडून आरोपी फरार झाले. या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
या हायप्रोफाईल हत्येमुळे मोठी खळबळ माजली आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी याप्रकरणी तपशीलवार तपास करत आहेत. सिद्दीकी यांच्यावर ३ जणांनी हल्ला केल्याचे उघडकीस आहे असून 2 शूटर्ससह आत्तापर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 विदेशी पिस्टल आणि एका देशी पिस्टलने हल्ला करण्यात आला. मात्र, विदेशी पिस्टलवर भारतात बंदी असताना ती भारतात आलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या शूट आऊट केसमध्ये आता पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून ड्रोनच्या सहाय्याने भारतात ही शस्त्र पाठवण्यात आली आणि नंतर हँडलर्सद्वारे मुंबईत पाठवली गेली. ही शस्त्र पाकिस्तानातून राजस्थान किंवा पंजाब बॉर्डरवर ड्रोनद्वारे मागवण्यात आली असावी असा क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा संशय आहे. तसेच बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या बिश्नोई गँगपर्यंत, ही शस्त्र पोहोचवण्यात पाकिस्तानी गँग किंवा ISI चाही हात असू शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांनी राजस्थान तसेच पंजाब पोलिसांना या पिस्टलचे फोटो पाठवले आहेत आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत. सीमेपलीकडे शस्त्रे कोणी पाठवली, कोणाच्या सांगण्यावरून पाठवली आणि या हत्येमागचा हेतू काय होता ? या प्रश्नांची उकल करणे हे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares