विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यात कोणताही अनुवहित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत. नाहनांची तपासणी, चेक पोस्ट तपासणी, यासोबतच गावठी कट्टे, दारू, गुटका आणि हिस्ट्री सीटर गुन्हेगारांना पकडणे सुरु केले आहे.
दिनांक १५ ऑक्टोबर पासून अर्थात आचारसंहिता लागू झाल्या पासून धुळे जिल्यात खालील प्रमाणे जप्ती आणि इतर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात ..
- पिस्टल-८
- जिवंत काडतुस-१०
- तलवारी- १९
- दारू – ३५ लाख ३७ हजार रुपये
- ड्रग्ज – ४२ लाख ८२ हजार रुपये
- गुटखा आणि इतर – ७८ लाख ५६ हजार रुपये
- टोटल – १ कोटी , ५९ लाख रपये
- पाहिजे असलेले पकडलेले आरोपी – १५७
- नॉन बेलेबल वॉरंट्स तामिल- ५२९५
- १२६ कलम प्रतिबंध कारवाही-५२२३
- १२८ कलम प्रतिबंध कारवाही- ७५
- १२९ कलम प्रतिबंध कारवाही-४१५
- गुजरात बरोबर केलेली संयुक्त रेड्स- २( २ गुजरात चे पाहिजे असलेले आरोपी पकडून दिले,७० हजाराची दारू गुजरात बॉर्डर वर जप्त)
- मध्य प्रदेश संयुक्त रेड्स -३ ( उमरठी या गवत रेड , २ एमपी चे पाहिजे आरोपी पकडून दिले ,६ लाखाची दारू एमपी बॉर्डर वर पडली )
- आंतर राज्य सीमा चेक पोस्ट – एमपी- ६, गुजरात- ३. त्यापैकी २ इंटीग्रेटेड चेक पोस्ट ( वन, एक्साइज , आरटीओ बरोबर संयुक्त )
- आंतर राज्य सीमा पोरोस पॉईंट्स -१२
- हद्दपार इसम -४३
- mpda इसम – ३
- एरिया डॉमिनेशन कंपन्या- २ आयटीबीपी,१ सीआरपीएफ, १ एसएसबी (एकूण ४)
- एक्सपेंडिचर सेंसिटिव पॉकेट्स – ५
- वायरलेस कम्युनिकेशन करिता शैडो एरिया मधे उभारलेले रिपेटर टॉवर्स -४
- बाहेरून घेण्यात येणाऱ्या भाडे तत्ववरील वाहने -१२९ जीप, ४ बस, २ ट्रक
- ईव्हीएम स्ट्राँग रूम गार्ड्स- ५६
- आर्म्स डिपॉज़िशन – ८९%
- एसएसटी-१५ एफएसटी-१६
अजून कारवाया करणे सुरूच असून पोलीस अधीक्षक श्रिकांत धिवरे यांनी जिल्हाभर अशा कारवाया करण्याच्या सूचना दिलेल्या आहे.