विवेक फाउंडेशन धाडरी यांच्यातर्फे दोनशे दिव्यांग,अंध,विधवा, मतिमंद बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने गुरुवारी मोफत किराणा बाजार वाटप करण्यात आले. दरवर्षी हा कार्यक्रम दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला जातो. बुधा पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
डोंगर कोळी, मनिषा बागुल, वैशाली पाटील व दिपाली अरगडे, बन्सीलाल कचवे,परमानंद गलाणी,एकनाथ पाटील, मुकुंद पाटील, सुभाषचंद बोरा, वामन पाटकर, सुशिल राजपूत,राजुभाऊ कोतेकर,संतोष निकम, नितीन सोनवणे, दिलीप बिरारीस,अग्रवाल काकाजी, सरलाताई पाटील, मंगलावती छोरीया, चंद्रकला बोरा,स्मिता पाटकर,मिनाक्षी छोरीया उपस्थित होते.
किराणा बाजाराचे संपूर्ण पँकिंग बालगोपाल मंडळाचे तुषार अहिरे, ईश्वरी अहिरे, जय निकम, रिया अहिरे, प्रांजल निकम यांनी केले. किराणा बाजारात साखर, बाजरी, तेल, दाळ,शेंगदाणे,रवा,भगर,मिरची, हळद, फरसाण, मुरमुरा, चहापावडर, सोनपापडी वस्तू देण्यात आले. स्व.सिरेमलजी छोगालालजी लुंकड परिवार यांच्या स्मरणार्थ सिमा मुरलीधर पाटील यांना पिठाची गिरणी देण्यात आली. मनिषा बागुल यांना वाँकर देण्यात आले.
अंध भगिनी सोनल आधार मिस्तरी यांनी स्वतः हाताने तयार करून आणलेली फुलदाणी रामलाल जैन परिवारास भेट दिली. स्वतः पण उद्योग सुरू करून स्वावलंबी बनावे हे मार्गदर्शन उपस्थितांना केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिभाऊ अहिरे, किशोर बोथरा,संभाजी अहिरे,नितीन जाधव, दगा बच्छाव, जिभाऊ बच्छाव, भुषण बच्छाव, साहिल बोथरा, सार्थक बोथरा,निखिल छोरीया, निकिता छोरीया,करणसिंग जाधव यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. प्रास्ताविक विवेक फाउंडेशनचे संस्थापक सदस्य धिरज लखिचंदजी छोरीया यांनी केले..
प्रतिनिधी तुषार देवरे, देऊर